औरंगाबाद : विद्यार्थिनीला विडीओ कॉल करून अश्लील चॅटिंग करणाऱ्या मनोज जैस्वाल या प्राध्यापकास तिच्या भावाने काळे फासल्याची घटना आज दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मनोज जैस्वाल हा शहरातील सरस्वती भुवन वाणिज्य महाविद्यालयाच्या व्होकेशनल विभागात कार्यरत आहे. याच विभागात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीस तो मागील काही दिवसांपासून विडीओ कॉल करायचा. यावेळी तो तिच्याशी अश्लील चॅटिंग करत तिला अश्लील नृत्य करण्यास भाग पडायचा. ही बाब विद्यार्थिनीच्या भावास समजल्यानंतर त्याने त्याच्या काही मित्रांसोबत महाविद्यालय गाठले. येथे प्राध्यापक कक्षात येत त्यांनी जैस्वालला जाब विचारात त्याच्या तोंडाला काळे फासले. आरोपी प्राध्यापक विवाहित असून त्याला दोन अपत्ये आहेत.