उस्मानाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येथील जिल्हा रूग्णालयात शनिवारी इपिलेप्सी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ या शिबिरात तब्बल २९० जणांच्या विविध तपासण्या करून औषधोपचार करण्यात आले़मुंबईतील डॉ़ निर्मल सूर्या, इपिलेप्सी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित शिबिराचे उद्घाटन आरोग्य उपसंचालक व्ही़ एम़ कुलकर्णी, डॉ. डॉ. निर्मल सूर्या यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी २९० रूग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले़ यात ५२ जणांची ईसीजी, १९ जणांचे सीटीस्कॅन, ८ जणांची प्रयोगशाळा तपासणी करून तीन महिन्यांसाठी औषधोपचार देण्यात आले़ यावेळी बोलताना डॉ़ सूर्या म्हणाले, ईपीलेप्सी हा आजारही इतर आजारांप्रमाणे नियमित औषधोपचाराने बरा होतो़ ज्या प्रमाणे अतिरिक्त दाब, शूगर आदी आजाराप्रमाणे फक्त २५ टक्के रूग्णांना कायमस्वरूपी उपचार घेण्याची गरज असून, उर्वरित ८० टक्के रूग्ण कायमचे बरे होवू शकतात, असे सांगून इपिलेप्सी आजाराबाबत माहिती दिली़ दरम्यान, इपिलेप्सी आजाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांनी यावेळी माहिती दिली़ तसेच ज्या- ज्या ठिकाणी फाऊंडेशनच्या वतीने शिबीर घेतले जाणार आहे, तेथे संबंधित रूग्णांनी याचा लाभ घ्यावा, औषधोपचार घ्यावेत, असे आवाहनही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ माले यांनी यावेळी केले़यावेळी डॉ़ बापूजी सावंत, डॉ़ दीपक पालांडे, डॉ़ उषा व इपिलेप्सी फाऊंडेशनचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ आऱबी़पवार, आयएमईचे अध्यक्ष डॉ़ सुरेश करंजकर, रूग्ण कल्याण समितीचे सदस्य अब्दूल लतिफ माजीद, सुनिल शेंडगे आदींची उपस्थिती होती़ कार्यक्रमासाठी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, आदी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)
२९० रुग्णांची तपासणी
By admin | Published: December 19, 2015 11:18 PM