५ हजार २८७ नागरिकांना दिली लस
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा यासाठी महापालिकेने वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. १४५ ठिकाणी लसीकरण करण्यात येत आहे. संचारबंदीतही नागरिकांनी लसीकरण मोहिमेला प्राधान्य दिले. पोलिसांनीही त्यांना सहकार्य केले.
शहरात येणारे ३९ नागरिक निघाले बाधित
औरंगाबाद : शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येक नागरिकाची एकूण सहा ठिकाणी महापालिकेकडून कोरोना तपासणी करण्यात येत आहे. शनिवारी या तपासणी मोहिमेत तब्बल ३९ नागरिक बाधित आढळून आले. त्यांना खाजगी रुग्णालये आणि महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.
रेल्वे स्टेशन, विमानतळावर १४ जण बाधित
औरंगाबाद : रेल्वे स्टेशन आणि विमानतळावर शनिवारी १२६ प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात आली. शुक्रवारी ज्या प्रवाशांची तपासणी केली होती त्यातील तब्बल १४ जण शनिवारी बाधित आढळले.