लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पोलिस अधीक्षक कार्यालयात १४ जुलै रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी विविध शाखेचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी हजर होते. नांदेड परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा घेतला. तसेच संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना यावेळी त्यांनी दिल्या. बैठकीस पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुजाता पाटील, पोनि एम. डी. थोरात यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
पोलीस महानिरीक्षकांनी घेतला आढावा
By admin | Published: July 15, 2017 12:10 AM