शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

माणुसकी हरवत चाललेल्या समाजात सुमित पंडित यांचा आशादायी आदर्श

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 8:08 PM

मुलगा मुलगी असे काहीच नाही, फक्त संस्कार आपण चांगले देत नाही’ अशा कीर्तनातून सुमित पंडित खेडे, तांडे, वस्त्यावरून जाऊन लोकांमध्ये स्त्रीभ्रुण हत्येविषयी जनजागर करीत आहेत. जटवाडा येथे राहणारे सुमित पंडित (२४) आणि त्यांची पत्नी पूजा हे जोडपे त्यांच्या समाजसेवेसाठी प्रसिद्ध आहे.

ठळक मुद्देरक्तदान करणाऱ्याची एक महिना व २१ दिवस मोफत दाढी-कटिंग ज्या घरात मुलीचा जन्म झाला, तिच्या वडिलांची दोन महिने २१ दिवस मोफत दाढी करण्याचा अभिनय उपक्रम सुमित यांनी यावर्षी सुरू केला.

औरंगाबाद : ‘मुलगा मुलगी असे काहीच नाही, फक्त संस्कार आपण चांगले देत नाही’ अशा कीर्तनातून सुमित पंडित खेडे, तांडे, वस्त्यावरून जाऊन लोकांमध्ये स्त्रीभ्रुण हत्येविषयी जनजागर करीत आहेत. जटवाडा येथे राहणारे सुमित पंडित (२४) आणि त्यांची पत्नी पूजा हे जोडपे त्यांच्या समाजसेवेसाठी प्रसिद्ध आहे.   

नाभिक काम करणारे सुमित पोटाला चिमटा काढून गोरगरीबांच्या मदतीला धावून जातात. घाटीमध्ये रात्री अपरात्री जेवण किंवा रक्त पोहचविणे असो, रस्त्यावरी बेवारस लोकांची स्वच्छता असो, गरजुंना औषधी पुरवणे, स्त्री-भ्रुण हत्येविराधातील अभियान किंवा खेडोपाड्यातील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवणे असो, स्वखर्च आणि कर्जकाढून ते मदत करतात.  

‘गरज असताना लोक आपल्याला मदत करत नाही, याचा अनेकदा अनुभव आला. घाटीत माझ्या मुलीच्या जन्माच्या वेळेस पत्नीला रक्ताची गरज होती. माझ्याकडे पैसे नव्हते. अक्षरश: रडूनही कोणी मदत केली नाही. तेव्हा ठरवले की, आपल्यावर जी पाळी आली ती इतरांवर येऊ नये’, असे सुमित यांनी सांगितले. 

तेव्हापासून ते रक्तदान शिबीर आयोजित करतात. रक्तदान करणाऱ्याची एक महिना व २१ दिवस मोफत दाढी-कटिंग करून देतात. घाटीत गोरगरीबांना हे मोफत रक्त पोचविण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम ते करतात. ‘शिबीर घेण्यासाठीही लोक जागा देत नाही. म्हणून माझ्या छोट्याशा दुकानातच रक्तदान शिबरी घेतो, असे ते सांगतात.  

मळकटलेले कपडे आणि वाढलेले केस अशा अवतारात रस्त्यांवर बेवारस राहणाºया लोकांची दयनीय अवस्था सुमित यांना पाहावली जात नाही. दर महिन्याला ते अशा लोकांची मोफत दाढी-कटिंग करून त्यांना आंघोळ घालतात. त्यांना उपचारासाठी घाटीला घेऊन जातात. आतापर्यंत ४२ बेवारसांनी त्यांनी मदत केली आहे.

दाढी-कटिंगच्या कमाईतून ते दररोज तीनशे रुपये समाजसेवेसाठी बाजूला काढून ठेवतात. समाजसेवा करायला श्रीमंती नाही तर मन मोठे असावे लागते. ‘दुनिया में आकर कमाया खुब हिरे क्या मोती, मगर कफन जेब नहीं होती’ हे त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान. डॉ. अब्दुल कलामांचा आदर्श घेऊन निघालेल्या या अवलियाला कोणी सोबत येईल की नाही याची चिंता नाही. ‘मी करत राहणार’, एवढाच त्यांचा निश्चय आहे.  

मुलीच्या वडिलांची मोफत दाढी ज्या घरात मुलीचा जन्म झाला, तिच्या वडिलांची दोन महिने २१ दिवस मोफत दाढी करण्याचा अभिनय उपक्रम सुमित यांनी यावर्षी सुरू केला. मुलगी झालेल्या दाम्पत्यांच्या घरी जाऊन ते वडिलांचा शालश्रीफळ देऊन सत्कार, आईला साडीची भेट, मुलीला ड्रेस आणि जावळे मोफत काढून देतात. तसेच टपाल कार्यालयात ‘सुकन्या’ योजनेंतर्गत त्या मुलीच्या नावे खाते उघडून त्यात २८१ रुपयेदेखील भरतात. आतापर्यंत त्यांनी अशी ५२ खाते उघडली आहेत. 

टॅग्स :social workerसमाजसेवकAurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी