खुलताबाद : तालुक्यातील जळालेले रोहित्र तत्काळ बसवा, अन्यथा महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करु, असा इशारा पंचायत समितीचे सभापती गणेश अधाने, भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे, संदीप निकम पाटील यांनी महावितरण कार्यालयाला दिला आहे.
अतिवृष्टी झाल्यामुळे खुलताबाद तालुक्यातील खरीप हंगामातील पिकेे हातची गेली आहे. आता रब्बी हंगामातील पिके जोमात असून केवळ विजेअभावी पिके करपून चालली आहे. अनेक शिवारातील रोहित्र जळालेले आहे. महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे जळालेले रोहित्र दोन-दोन महिने होऊनही शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून ते मेटाकुटीला आले आहेत. जळालेली व नादुरुस्त झालेले रोहित्र तत्काळ बसवून द्यावे, अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन महावितरण कार्यालयासमोर तीव्र लढा उभारु असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
फोटो : खुलताबाद तालुक्यातील नादुरूस्त रोहित्र दुरुस्त करण्याच्या मागणीचे निवेदन महावितरणच्या अभियंत्याला देताना सभापती गणेश आधाने, प्रकाश वाकळे, संदीप निकम आदी.