औरंगाबाद : दीडशे मोबाइल ॲपवरून तत्काळ कर्ज मंजूर करून देण्याच्या जाहिराती सोशल मीडियावर प्रसारित केल्या जातात. या जाहिरातीला भुलून कर्ज घेतलेल्या नागरिकांचा छळ होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांनी ॲपच्या माध्यमातून कर्ज घेऊ नये, असे आवाहन सायबरचे निरीक्षक गौतम पातारे यांनी केले.
शहरातील अनेक नागरिकांना कोणतेही तारण न देता तात्काळ कर्ज मंजूर करण्यात येईल, असे मेसेज येतात. याला भुलून नागरिक ॲप डाऊनलोड करतात. कर्ज मंजूर करण्यासाठी छायाचित्र, आधार, पॅनकार्ड, बँक डिटेल्स देतात. त्याशिवायही इतरही कागदपत्रे ॲपवर अपलोड करतात. त्या कागदपत्रांच्या आधारे एक दिवसात ४ हजार ते १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर केले जाते. कर्ज मंजुरीनंतर त्यावर भरमसाठ व्याज आकारले जाते. ते व्याजासह पैसे ठरलेल्या वेळी चुकते करावे लागतात. त्याच्या वसुलीसाठी विविध पद्धतींंचा अवलंब केला जात असल्याच्या तक्रारी सायबर पोलिसांकडे येत आहेत. फसलेले नागरिक मदत मागतात, मात्र बदनामीच्या भीतीपोटी तक्रार नोंदविण्यास तयार होत नाहीत.
छायाचित्रांचे विकृृतीकरणज्यांनी कर्ज घेतलेले असते. त्यांच्याकडून अधिकची रक्कम उकळण्यासाठी ॲपवाले कर्ज घेणाऱ्यांचे छायाचित्र मॉर्फ करतात. त्यांच्याकडे ॲपच्या माध्यमातून जमा झालेल्या डाटाच्या माध्यमातून ते मॉर्फ केलेले छायाचित्र नातेवाइकांसह सोशल मीडियात व्हायरल करतात.
हे आहेत ॲपगोल्डमॅन पेबॅक, एक्सप्रेस लोन, रुपी स्टार, फर्स्ट कॅश, रिच, फर्स्ट रुपी, अपना पैसा, भारत कॅश, स्मार्ट कॉईन, कॅश मशीन लोन, मोअर कॅश, लोन क्युब, स्टार लोन, स्काय लोन, क्रेझी कॅश, इनकम, हॅण्डी लोन, वॉव् रुपी, लोन गो, कॉइन रुपी, फॉर पे, लोन लोजी, कॅश कोला, मो कॅश, यूपीए लोन, हु कॅश, फर्स्ट पैसा अशा १५० ॲपशी यादीच सायबर पोलिसांनी दिली आहे.
आमिषाला बळी पडू नयेनागरिकांनी झटपट कर्ज घेण्यासाठी कोणत्याही ॲपच्या माध्यमातून प्रयत्न करू नयेत. त्यात मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. या लोनच्या प्रकाराला रिझर्व्ह बँकेची परवानगी घेण्यात आलेली नसते. त्यामुळे नागरिकांनी आमिषाला बळी पडू नये.- गौतम पातारे, निरीक्षक, सायबर ठाणे