शहरं
Join us  
Trending Stories
1
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
2
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
3
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
4
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
5
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
6
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
7
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
10
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
11
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
12
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
13
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
14
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
15
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
16
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
17
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
18
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
19
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
20
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 

उच्च न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर करणारे संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 11:02 PM

शासनाने स्थलांतरित केलेली मतिमंद विद्यार्थ्यांची निवासी शाळा मूळ जागीच चालू असल्याचे भासविण्यासाठी उच्च न्यायालयात बनावट कागदपत्रे दाखल करण्यात आली होती. याची गांभीर्याने दखल घेत खंडपीठाचे न्या. ता.वि. नलावडे आणि न्या. एस.के. कोतवाल यांनी याचिकाकर्ते संबंधित संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाचे प्रबंधक (प्रशासकीय) यांना दिले आहेत.

औरंगाबाद : शासनाने स्थलांतरित केलेली मतिमंद विद्यार्थ्यांची निवासी शाळा मूळ जागीच चालू असल्याचे भासविण्यासाठी उच्च न्यायालयात बनावट कागदपत्रे दाखल करण्यात आली होती. याची गांभीर्याने दखल घेत खंडपीठाचे न्या. ता.वि. नलावडे आणि न्या. एस.के. कोतवाल यांनी याचिकाकर्ते संबंधित संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाचे प्रबंधक (प्रशासकीय) यांना दिले आहेत.खंडपीठाने याचिका फेटाळून स्थलांतरित ठिकाणी शाळा चालू ठेवावी, असेही आदेशात म्हटले आहे.लातूर जिल्ह्यातील डोंगरकोनाळी येथील ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वढवाणा बुद्रुक, तालुका उदगीर येथील समर्थ धोंडू तात्या निवासी मतिमंद शाळेचा परवाना राज्य शासनाने २०१३ साली रद्द केला होता. सदर मतिमंद विद्यार्थ्यांची निवासी शाळा शासनाने उदगीर तालुक्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील आस्था चॅरिटेबल संस्थेकडे स्थलांतरित केली होती.या निर्णयाविरुद्ध संस्थेचे अध्यक्ष कोंडिबा जळबा शिंदे आणि मुख्याध्यापिका शिल्पा लक्ष्मणराव कांबळे यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. शाळेचा परवाना रद्द करू नका, शाळा चालू राहू द्या, शाळेचे स्थलांतर रद्द करा, अशी विनंती त्यांनी केली होती. सदर शाळा मूळ जागीच चालू असल्याचे दर्शविण्यासाठी याचिकाकर्त्यांनी अहमदपूर येथील जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख अनिल जाधव यांनी सदर शाळेला भेट देऊन तपासणी केल्याचा अभिप्राय नोंदविल्याबाबत रजिस्टर न्यायालयात सादर केले.सरकारमार्फत जिल्हा समाजकल्याण अधिकारी लातूर जिल्हा परिषद यांनी उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले. त्यात म्हटले की, केंद्रप्रमुख अनिल जाधव यांनी सदर शाळेला कधीही भेट दिली नाही. याचिकाकर्त्यांनी दाखल केलेले रजिस्टर खोटे आहे. अभिप्रायावर जाधव यांची स्वाक्षरी नाही किंवा शिक्का नाही, तर जाधव यांनी शपथपत्र दाखल करून वरील बाबींचा पुनरुच्चार करून संबंधितांवर कारवाई करण्याची विनंती केली होती. याची गंभीर दखल घेत खंडपीठाने संस्थेचे अध्यक्ष कोंडिबा जळबा शिंदे आणि मुख्याध्यापिका शिल्पा लक्ष्मणराव कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. या प्रकरणात सहायक सरकारी वकील महेंद्र नेरलीकर यांनी, तर स्थलांतरित शाळेतर्फे अ‍ॅड. सचिन पन्हाळे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयEducation Sectorशिक्षण क्षेत्र