गल्लेबोरगाव, पळसवाडीत अब्दुल सत्तार यांच्याकडून नुकसानीची पाहणी
खुलताबाद : महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव, पळसवाडी परिसरातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनास दिले.
तालुक्यात चार दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाल्याने पिकांसह रस्ते, पुलांची हानी झाली. रविवारी दुपारी राज्यमंत्री सत्तार यांनी वेरूळ महसूल मंडळातील गल्लेबोरगाव व पळसवाडी परिसरातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी माजी आ. अण्णासाहेब माने, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, सरपंच विशाल खोसरे, सरपंच दगडू भेंडे, उपसभापती युवराज ठेंगडे, उपसरपंच सोमनाथ ठेंगडे, सुधाकर दहिवाळ, रामदास चंद्रटिके, तुकाराम हारदे, शब्बीर शहा, के.एस. गवारे, महेश दहीवाळ, संतोष ठेंगडे, रमेश ठेंगडे, सीताराम पवार आदी उपस्थित होते.
---- फोटो
120921\1533-img-20210912-wa0048.jpg
बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी