शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

'आईवडिलांचा अपमान सहन होणार नाही'; व्हाट्सअपवर स्टेट्स ठेऊन दोन मित्रांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2021 6:54 PM

Two friends commit suicide : युवकांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देआमच्यामुळे तुम्हाला कोणी वाईट बोलेल हे आम्हाला सहन होणार नाही. मृत्यूस जबाबदार आरोपींना पोलिसामार्फत फाशीची शिक्षा द्यायला लावा

सिल्लोड : तालुक्यातील पिंप्री येथे दोन मित्रांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. योगेश सुधाकर खिस्ते ( 23 ) व ज्ञानेश्वर गणेश शिरसाट ( 20 ) असे मृतांची नावे आहेत. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट व्हाट्सअपवर स्टेट्स म्हणून ठेवली होती. यावरून शेख मोईन, शेख मुश्ताक व एक महिला यांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (  Two friends commit suicide by posting status on WhatsApp) 

अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री योगेश सुधाकर खिस्ते व त्याचा मित्र ज्ञानेश्वर गणेश शिरसाट यांनी आम्ही आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट व्हाट्सअपवर स्टेट्सवर ठेवली. हे स्टेटस विजय आनंदा पवार यांनी पाहिले. त्यांनी दोघांना तत्काळ फोन लावला मात्र कोणीच फोन उचला नाही. यानंतर पवार यांनी भुसार मालाच्या गोडाऊनवर जाऊन पाहिले असता गोडाऊनमध्ये योगेश व ज्ञानेश्वर यांनी गळफास घेतल्याचे  निदर्शनास आले. विजय पवार यांनी तात्काळ ग्रामीण पोलिसांशी संपर्क करून दोन्ही युवकांनी आत्महत्या केल्याची माहिती दिली. सपोनी प्रल्हाद मुंडे,पोलीस उपनिरीक्षक विकास आडे यांनी सहकार्यासोबत घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही युवकांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मंगळवारी सकाळी दोन्ही युवकांचे शवविच्छेदन करून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दोन्ही मित्रांवर  पिंप्री येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत योगेश खिस्ते यांच्या पश्चात एक बहीण, एक भाऊ ,आईवडील तर ज्ञानेश्वर शिरसाठ याच्या पश्चात एक भाऊ,एक बहीण,आई वडील असा परिवार आहे. दरम्यान, याप्रकरणी युवकांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

आईवडिलांचा अपमान सहन होणार नाहीयोगेश खिस्ते व ज्ञानेश्वर शिरसाठ या दोन्ही मित्रांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिट्ठी लिहून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यात, 'आईबाबा आम्हाला माफ करा. तुम्ही आम्हाला फार कष्ट करून मोठे केले पण आमच्यामुळे तुम्हाला कोणी वाईट बोलेल हे आम्हाला सहन होणार नाही. आमच्यावर शेख मोईन याने भोकरदन येथे खोटा गुन्हा दाखल केला आहे. मोईन हा त्याचा एक मित्र शेख मुश्ताक व एक महिलेला घेऊन लोकांच्या शेतात रात्री येत होता, आम्ही त्यांना पकडले. मात्र, त्याने आम्हालाच फसविण्याचा प्रयत्न केला. आम्हाला आमच्या आईवडिलांचा अपमान सहन होणार नाही. त्यामुळे आम्ही आत्महत्या करीत आहोत. आमच्या मृत्यूनंतर रडू नका. आमच्या बहिणीचे थाटात लग्न करा. आमच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोपींना पोलिसामार्फत फाशीची शिक्षा द्यायला लावा. आमच्या परिवाराला 30 लाख रुपये आर्थिक मदत द्या', असे नमूद केले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी