उत्तर : कोरोनाच्या संसर्गामुळे पहिली लाट, दुसरी लाट आली आता तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. जग कधी कोरोनामुक्त होईल याचे उत्तर कोणाकडेच नाही. मागील मार्च २०२० पासून ऑफलाईन क्लासेस बंद झाले. अनेकजण ऑफलाईन क्लासेस कधी सुरू होतील याची अजूनही प्रतीक्षा करत बसले आहेत. मात्र, ११ वी व १२ वी तसेच सीए फाऊंडेशनची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्या अभ्यासात खंड पडला होता. त्यांना निराशाच्या खाईतून सुखरूप बाहेर काढण्यासाठी व लॉकडाऊनचा सदुपयोग करण्यासाठी इंटलेक्ट क्लासेसने मागील वर्षीच सर्वप्रथम ऑनलाईन क्लासेस सुरू केले. नुसते क्लासेस सुरू केले नाहीत तर विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन अभ्यासाविषयी गोडी निर्माण होण्यासाठी शिकविण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आला. ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन क्लासेसची आवड निर्माण झाली. २५ जूनपासून एक ऑनलाईन बॅच सुरू झाली. आता १५ जुलैपासून दुसरी बॅच सुरु होत आहे व येत्या दोन महिन्याच्या काळात आणखी दोन ते तीन ऑनलाईन बॅच सुरु होत आहे. एका बॅचमध्ये ५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या प्रतिसादामुळे आमचे ऑनलाईन क्लासेस यशस्वी ठरले आहे.
प्रश्न : मागील वर्षी सीए फाऊंडेशन परीक्षेत क्लासेसचे किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले?
उत्तर : कोविडमुळे मागील वर्षी मार्चपासून लॉकडाऊन सुररू झाले. त्यावेळीस आम्ही ऑनलाईन क्लासेस घेणे सुरु केले. डिसेंबर २०२० मध्ये सीए फाऊंडेशनची परीक्षा झाली. त्यासाठी शहरात १५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील इंटलेक्ट क्लासेसचे ९३ विद्यार्थ्यांचा समावेश होता. ऑनलाईन शिक्षण घेऊनही ९३ विद्यार्थी सीए फाऊंडेशन परीक्षा उत्तीर्ण झाले हे मोठे यश ठरले.
प्रश्न : येत्या काळात क्लासेसचे किती विद्यार्थी सीए फाऊंडेशन परीक्षा देतील.
उत्तर : जुलैमध्ये सीए फाऊंडेशनच्या परीक्षा देण्यासाठी क्लासेसचे १३० ते १४० विद्यार्थी सज्ज झाले आहेत. यातील ७५ ते ८० विद्यार्थी उत्तीर्ण होतील, एवढी खात्री आहे. जुलै व नोव्हेंबर या दोन फाऊंडेशन परीक्षा मिळून २०० ते २२५ विद्यार्थी परीक्षा देतील. तर २०२२ - २०२३ या वर्षात क्लासेसचे ४०० ते ४५० विद्यार्थी सीए फाऊंडेशन परीक्षा देतील.
प्रश्न : ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी टिकविणे किती कठीण होते.
उत्तर : विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सवय नव्हती. यामुळे ऑनलाईन क्लासेसमध्ये विद्यार्थी बसत नाहीत, अशी सर्वत्र ओरड होत होती. आम्हाला मात्र, यापेक्षा वेगळा अनुभव आला. इंटलेक्ट ऑनलाईन क्लासेसमध्ये ७० ते ८० टक्के विद्यार्थी हजर असतात हेच आमच्या नावीन्यपूर्ण ऑनलाईन शिकविण्याच्या पद्धतीचे यश आहे. कारण, ऑनलाईन क्लासमध्ये विद्यार्थी टिकवून ठेवणे अवघड काम होते, ते आम्ही लीलया पेलले आहे.
(इंटलेक्ट क्लासेस एलएमएस जोड १)