बळीराम लाड । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : भारतीय विद्यापीठ असोसिएशन व आंतरविद्यापीठ क्रीडा मंडळ दिल्ली यांच्या वतीने २०१७-१८ मध्ये होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर झाला. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला मुलांच्या गटात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेचे यजमानपद मिळाले.आंतरविद्यापीठ क्रीडा मंडळाच्या वतीने जाहीर झालेला कार्यक्रम असा- अॅथलेटिक्स (गुंटूर) वुशू बेसबॉल (रोहतक), क्रॉसकंट्री (बेळगाव), तलवारबाजी (अमृतसर), जिम्नॅस्टिक (कुरुक्षेत्र), ज्युदो (टिळक विद्यापीठ पुणे), पॉवरलिफ्टींग (जालंधर), सेपक टाकरा (हैदराबाद), तायक्वांदो व रस्सीखेच (अमृतसर), नेटबॉल (मंगलोर), सॉफ्टबॉल (कुरुक्षेत्र), बॉस्केटबॉल (वाराणसी), क्रिकेट (अंबाला). स्वारातीम विद्यापीठाने खो-खो, हॅन्डबॉल, कबड्डी, ज्युदो, बास्केटबॉल, बॅडमिंटन, कबड्डी इ. खेळांचे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावर्षी होणाऱ्या आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेचे आयोजन व नियोजन उत्कृष्टरित्या यशस्वीपणे केले जाणार असल्याची माहिती विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांनी दिली.
आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेचे ‘स्वारातीम’ला यजमानपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2017 12:10 AM