शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

मराठा मुलांना ४० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्जावर व्याजमाफी; अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 2:04 PM

लवकरच शासन निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ४० लाख रुपयांची व्याजमाफी शैक्षणिक कर्ज योजना आणण्याचा निर्णय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने घेतला आहे. या विषयासंदर्भातील शासन निर्णय लवकरच जारी होईल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी रविवारी येथे ‘लोकमत’शी बोलताना दिली.

याबाबत माहिती देताना पाटील म्हणाले की, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जावर लागणारे व्याज महामंडळाने भरावे, अशी मागणी मराठा समाजबांधवांकडून  करण्यात येत होती. या मागणीची दखल घेऊन महामंडळाच्या बोर्ड बैठकीत मराठा विद्यार्थ्यांसाठी ४० लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जावर व्याज परतावा देण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा शासन निर्णय लवकरच शासनाकडून जाहीर करण्यात येणार आहे.

११ कोटी ८४ लाखांचा गट कर्ज व्याज परतावा

  • गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत शासकीय नोंदणीकृत संस्था, कंपन्यांना उद्योगासाठी ५० लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज मर्यादेसाठी घेतलेल्या कर्जावर १२ टक्के अथवा १५ लाखांच्या मर्यादेत कर्ज परतावा दिला जातो. या अंतर्गत ६२४ जणांना महामंडळाने पात्रता प्रमाणपत्र प्रदान केले. यापैकी ४७६ लाभार्थ्यांना बँकेकडून ११ कोटी ८४ लाख रुपये  व्याज परतावा देण्यात आला. 
  • गट प्रकल्प कर्ज योजनेंतर्गत १० लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उद्योगांसाठी सात वर्षांकरिता व्याज माफी योजना राबविली जाते. या योजनेत ३५ अर्जदारांना ३ कोटी ३५ लाख कर्ज वाटप करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

महामंडळाचे लवकरच कॉल सेंटर

  • महामंडळाच्या योजनांची माहिती सर्वसामान्य मराठा समाजाला व्हावी, तसेच महामंडळाकडून कर्ज घेतल्यानंतर व्याज परतावा मिळण्यात काही अडचणी येत असेल तर याविषयीच्या तक्रारींचे निरसन करणे आणि कर्ज प्रस्तावावर बँकेने काय निर्णय घेतला, 
  • याविषयी माहिती देण्यासाठी महामंडळाचे कॉल सेंटर लवकर सुरू होणार असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
टॅग्स :marathaमराठा