वर्षापासून जरंडी गावातील वाहतूक बायपास मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे वृद्ध नागरिकांना वर्षभरापासून बसने प्रवास करण्यासाठी एक कि. मी. पायी प्रवास करून बस पकडावी लागते. जरंडी बसस्थानक ते बनोटी रस्त्याला जोडणाऱ्या गावांतर्गत रस्त्याला तब्बल दोन वर्षांपासून मंजुरी मिळाली आहे. संबंधित ठेकेदाराने काम सुरू करून रस्त्यावर खडी अंथरूण ठेवली आहे. त्यानंतर अचानक काम थांबविल्यामुळे हे काम रखडले आहे. जरंडी गावांतर्गत रस्त्याचा निधी संबंधित ठेकेदाराने दुसरीकडे वापरला असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे यांनी केला आहे. संबंधित ठेकेदाराला प्रशासनाचे अभय असल्याचा आरोपही सोनवणे यांनी केला आहे. जरंडीचा हा रस्ता कधी होणार याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
छायाचित्रओळ : जरंडी गावांतर्गत रस्त्याची झालेली चाळणी.