शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
2
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
3
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
4
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
6
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
7
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
8
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
10
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
11
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
12
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
13
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
14
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
15
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
17
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
18
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
19
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
20
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र

अंतर्गत रस्तेही खराब

By admin | Published: September 25, 2016 11:43 PM

बीड : परतीच्या मार्गावरील पावसाने रविवारी तिसऱ्या दिवशी सुटी घेतली. त्यामुळे दोन दिवस पाण्याखाली गेलेले रस्ते अखेर ‘उघडे’ पडले. सगळीकडेच रस्त्यांची पुरती ‘वाट’ लागली

बीड : परतीच्या मार्गावरील पावसाने रविवारी तिसऱ्या दिवशी सुटी घेतली. त्यामुळे दोन दिवस पाण्याखाली गेलेले रस्ते अखेर ‘उघडे’ पडले. सगळीकडेच रस्त्यांची पुरती ‘वाट’ लागली असून शहरातून जाणाऱ्या धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाची अक्षरश: चाळणी झाली आहे. आधीच या महामार्गावर खड्डे होते, पावसाने त्यात भर पडली, शिवाय पाणी साचून राहिल्याने आकारही वाढला. त्यामुळे वाहनचालकांची त्रेधातिरपीट सुरु आहे. शहरातून गेलेल्या महामार्गावरील चार किमी अंतरावर पडलेले खड्डे चुकविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या मार्गावरुन जाताना हा राष्ट्रीय महामार्गच आहे का? असा प्रश्न वाहनचालकांना पडल्यावाचून राहत नाही. या मार्गावरील खड्ड्यांची समस्या नित्याची बनली आहे;परंतु सलग दोन दिवसांच्या पावसाने खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांत वाहने आदळून दुचाकीस्वारांना पाठ, मणक्याचे त्रास होऊ लागले आहेत. चारचाकी वाहनांचे सुटे भाग निखळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. वाहनचालकांप्रमाणेच पादचाऱ्यांनाही कसरत करावी लागत आहे. बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व शाहूनगर रोड ते वळणरस्ता इथपर्यंत असंख्य खड्डे आहेत. अल्पशा पावसातही पाणी साचत असल्याने ते ओळखणेही कठीण बनत आहे. शाहूनगर रोड ते सेंट अ‍ॅन्स स्कूलपर्यंतचा महामार्ग दोन दिवस पाण्याखाली होता. खड्ड्यांचा सर्वाधिक त्रास दुचाकीस्वार महिला व मुलींना होतो. (प्रतिनिधी) वाहतूक वळवली तरीही.. ४बार्शी रोडवरील बिंदुसरा नदीवरील निजामकालीन पूल कालबाह्य झाल्याने जडवाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शहरात वाहनसंख्या नियंत्रित राहील. मात्र, खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळू शकते, अशी स्थिती आहे. एकूणच वाहतूक वळविल्यानंतरही महामार्गामागचे ग्रहण कायम आहे. शहरातील पेठ बीड, धानोरा रोड, आदित्यनगरी, एकनाथनगर, पिंपरगव्हाण रोड, शाहूनगर, मोमीनपुरा, करीमपुरा, सुभाष रोड, मोंढा, स्वराज्यनगर, धांडेगल्ली, भाजीमंडई, पोलीस कॉलनी या भागातील रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे. पावसाने नागरिकांची तारांबळ उडत असून खड्ड्यांतील पाणी अंगावर उडून येत असल्याने वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत.