लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘अखिल भारतीय स्त्रीरोग एंडोस्कोपी व वंध्यत्व उपचार’ या विषयावर २३ ते २५ फेब्रुवारीला एंडोवर्ल्ड हॉस्पिटल येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ६० रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.भारतीय स्त्रीरोग एंडोस्कोपिस्ट असोसिएशन व औरंगाबाद स्त्रीरोग संघटनेतर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यात देश-विदेशातील एक हजार डॉक्टर सहभागी होणार आहेत. परिषदेत तज्ज्ञ डॉक्टर स्त्रीरोग एंडोस्कोपी आणि वंध्यत्व उपचारावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच एंडोस्कोपी शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपण सभागृहातील डॉक्टरांसाठी केले जाणार आहे. यावेळी गर्भपिशवी काढणे, गर्भपिशवीची गाठ काढणे, गर्भनलिका उघडणे आणि बंद करणे, गर्भपिशवीतील पडदा काढणे, तसेच गर्भाशयासंबंधित इतर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.यावेळी डॉ. पंडित पळसकर, डॉ. वीणा पानट, डॉ.जयश्री जाधव, डॉ. राजेंद्र्रसिंग परदेशी, डॉ. अजय माने, डॉ. विक्रम लोखंडे, डॉ. विनोद भिवसने, डॉ. प्रशांत भिंगारे, डॉ. रिंकू पळसकर, डॉ. अर्चना गडकरी, डॉ. कुणाल जाधव, डॉ. कल्याण बरमठे, डॉ. घनश्याम मगर, डॉ. रोहित गडकरी, डॉ. अर्चना राजूल, डॉ. संजय खंडागळे, डॉ. विनायक खेडकर यांच्यासह संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.योग्य वयात व्हावे लग्नवंध्यत्व म्हटले की, केवळ महिलांची तपासणी केली जाते; परंतु पुरुषांचीही तपासणी महत्त्वाची ठरते. १०० पैकी १० जोडप्यांत वंध्यत्व आढळते. उशिरा लग्न केल्यानंतर ही समस्या अधिक दिसते. त्यामुळे २० ते ३० वर्षे वयात महिलांचे, तर २५ ते ३० वर्षे वयात पुरुषांचे लग्न होणे हे योग्य ठरते, असे तज्ज्ञांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय परिषदेत होणार वंध्यत्वावर विचारमंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 1:04 AM