औरंगाबाद : शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने कार्यरत असलेल्या महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. ही त्रिदशकपूर्ती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून विवेकवाद्यांची आंतरराष्टÑीय परिषद मुंबईत आयोजित केली जाणार आहे. त्यात दहा देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. शिवाय अमर्त्य सेन व मलाला या दिग्गजांनाही परिषदेचे निमंत्रण देण्यात आले आहे.ही माहिती आज येथे एका पत्रपरिषदेत अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली. यावेळी शहाजी भोसले, डॉ.श्याम महाजन, डॉ. रश्मी महाजन, कॉ. बाबा आरगडे, अॅड. रंजना गवांदे, अशोक गवांदे आदींची उपस्थिती होती.यावेळी सांगण्यात आले की, अंनिसच्या संघटित कामाचा लेखाजोखा मांडायचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी विशेषांक निर्मिती व प्रकाशनाची तयारी सुरू आहे. महाराष्टÑाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आमच्या कामाबद्दल त्यांचे निरीक्षण, मूल्यमापनदेखील जाणून घेतले जाईल. मुंबईत ९, १० व ११ आॅगस्ट रोजी विवेकवाद्यांची आंतरराष्टÑीय परिषद व अंनिसचे राज्यस्तरीय अधिवेशन होईल.१५ आॅगस्ट २०१९ ते १ मे २०२० म्हणजे महाराष्टÑ राज्याच्या साठाव्या वर्धापन दिनापर्यंतच्या कालावधीत आम्ही संघटनेतर्फे विविधांगी पद्धतीने व मार्गाने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटित कार्याचे योगदान जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे अभियान राबविणार आहोत. हे अभियान औरंगाबादपर्यंत पोहोचेल, असेही अविनाश पाटील यांनी जाहीर केले.एका प्रश्नाच्या उत्तरात अविनाश पाटील यांनी सांगितले की, अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झाल्यापासून उघडपणे चमत्काराचा दावा करणारे बाबा आता थांबले आहेत. भोंदू बाबांच्या विरोधात ५०० एफआयआर दाखल झालेल्या आहेत. १५जणांना शिक्षा झालेल्या आहेत.महाराष्टÑातील व देशातील जनतेने अंधश्रद्धा निर्मूलन ही मानवी विकासातील, प्रगतीतील व आधुनिकीकरणासाठी अत्यावश्यक बाब आहे, हे नक्की स्वीकारलेले आहे, असा दावा पाटील- शहाजी भोसले यांनी यावेळी केला.
अंनिसच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त विवेकवाद्यांची आंतरराष्टय परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:22 AM
औरंगाबाद : शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने कार्यरत असलेल्या महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. ही ...
ठळक मुद्देदहा देश सहभागी होणार : अमर्त्य सेन व मलाला यांना निमंत्रण