शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

स्टील उद्योगातील आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान औरंगाबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 7:05 PM

उत्पादन निर्यात होण्याचे प्रमाणही मोठे असेल

ठळक मुद्देएनएलएमकेचा पूर्ण प्लांट ऑटोमॅटिक ऑरिक सिटीऐवजी बिडकीनमध्ये या उद्योगाला जागा

औरंगाबाद : रशियातील सर्वात मोठी व जगातील २० व्या रँकवर असणारी नोव्होलिपटेस्क स्टील कंपनी (एनएलएमके) औरंगाबादच्या शेंद्रा-बिडकीन इंडस्ट्रियल पार्कमध्ये येण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. स्टील उद्योगातील आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान या उद्योगाच्या निमित्ताने औरंगाबाद येणार आहे. इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चरला लागणारे स्टील एनएलएमकेच्या जगभरातील प्रकल्पांमध्ये तयार होते. तेच उत्पादन आता औरंगाबादेत होणे शक्य आहे. 

ऑरिक सिटीऐवजी बिडकीनमध्ये या उद्योगाला जागा देण्याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती उद्योग वर्तुळातून पुढे आली आहे. औरंगाबाद-जालना हे स्टील उद्योगाचे हब म्हणून ओळखले जात असले तरी कन्स्ट्रक्शन्स क्षेत्रासाठी लागणारेच स्टील येथे उत्पादित केले जाते. एनएलएमकेमुळे स्टील उद्योगातील नवीन  तंत्रज्ञान पूर्ण मराठवाड्याला मिळेल. देशभरातील इलेक्ट्रिकल्स पायाभूत सुविधांची गरज मोठ्या प्रमाणात पुरविण्याची क्षमता या उद्योगात आहे. मुंबई-दिल्ली-इंडस्ट्रीयल-कॉरिडॉर (डीएमआयसी) मध्ये अँकर प्रोजेक्टसाठी सुरू असलेले प्रयत्न या उद्योगामुळे यशस्वी होणार आहेत. पहिल्या टप्प्यात ८०० कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात ६ हजार कोटींची गुंतवणूक हा उद्योग येथे करणार आहे. 

रोजगाराच्या संधी वाढतीलमराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य तथा उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले, या उद्योगामुळे निर्यातीचा टक्का वाढेल. शिवाय नवीन तंत्रज्ञान येथे येईल. प्रकल्प आॅटोमेटिक असला तरी मटेरियल ओरिएन्टेड असेल. उत्पादन करताना, उत्पादन हाताळताना लागणारी यंत्रणा मनुष्यबळाची असेल. तसेच पुरवठादारांची साखळी, जड ट्रान्स्पोर्ट व लॉजिस्टीक, वेअर हाऊस, डेपो यातूनही थेट रोजगाराच्या संधी मिळतील. इलेक्ट्रिकल, वीज क्षेत्रासाठी लागणारे स्टील आयात करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल. जागतिक पातळीवरील उत्पादन या उद्योगामुळे वीजक्षेत्राला मिळेल. तसेच येथील निर्यातदरही वाढेल.

पर्यावरणपूरकतेची अपेक्षास्टील उत्पादन करणाऱ्या उद्योगातून हवेचे प्रदूषण होण्याची शक्यता जास्त असते; परंतु एनएलएमके हा आंतरराष्ट्रीय उद्योग आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक असाच औरंगाबादेतील प्रकल्प असेल. हवेचे प्रदूषण स्टील उद्योगांसाठी एक आव्हान असते. तो एक संवेदनशील विषय आहे. जागतिक पातळीवरील गु्रप असल्यामुळे पर्यावरणपूरकतेबाबत ते सतर्क असतील. जागतिक पातळीवरील पर्यावरणपूरक तंत्रज्ञान कंपनी घेऊन येईल, त्याचा येथील स्टील उद्योगांनादेखील फायदा होईल, असे मत उद्योग वर्तुळातून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Auric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरAurangabadऔरंगाबाद