औरंगाबाद : नुकत्याच रिलीज झालेल्या रेल - ८ बिटा आॅपरेटिंग सिस्टीमची माहिती विद्यार्थ्यांना होण्यासाठी एमआयटी महाविद्यालयात कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यशाळेत प्रा. सुरेश भवर आणि प्रा. प्रशांत खोसरे यांनी रेल ८ ओएसचे इन्स्टॉलेशनचे आणि कॉकपीट निरीक्षण केंद्राचे डेमॉन्स्ट्रेशन केले. यात विद्यार्थ्यांनी लॅपटॉपमधील डेटा सुरक्षित ठेऊन ओरॅकल व्हर्चुअल बॉक्सच्या तंत्रज्ञानाने रेल -८ ची लिनक्स आॅपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केली. या तंत्रज्ञानाच्या आधारावर विद्यार्थी रेल -८ लिनक्स सराव घरीही करू शकतील.
कार्यशाळेत प्रा. प्रमोद सूर्यवंशी यांनी रेल - ८ ने नवीन निर्माण केलेल्या कंटेनर तंत्रज्ञानाचा पॉडमॅन वापरुन डेमो दाखविला आणि सर्वानी कंटेनर रन करुन बघितले. सध्या क्लाउड क्षेत्रात कंटेनरचा उपयोग प्रचंड मोठ्या प्रमाणावर होत आहे. अॅपवर ताण वाढला म्हणजे, युजर्स वाढले अथवा साईट व्हिजिट्स मोठ्या प्रमाणावर वाढल्या की कंटेनर तंत्रज्ञान सर्व्हरची क्षमता आपोआप वाढविते. त्यामुळे अॅपच्या किंवा वेबसाईटच्या कोणत्याही ग्राहकाला अखंड सर्व्हिस मिळते.
अॅप किंवा वेबसाईट मार्फत सेवा देणाऱ्या कंपनीचे सेवा खंडित झाल्यामुळे अथवा सर्व्हर हँग होण्यामुळे होणारे नुकसान कंटेनर तंत्रज्ञानाने होत नसल्याचे प्रा. सूर्यवंशी यांनी सांगितले. प्रा. रवींद्र पाटील यांनी रेल -८ वर नोड, जेएस आणि डॉटनेटचे अॅप निर्माण करण्याचे प्रशिक्षण दिले .