दुपारपर्यंतच आटोपल्या कॉंग्रेसच्या विधानसभेसाठीच्या मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 08:16 PM2019-07-31T20:16:03+5:302019-07-31T20:18:56+5:30
औरंगाबाद पश्चिम व पूर्व वगळता अन्य मतदारसंघांसाठी इच्छुकांची संख्या मोठी नव्हतीच.
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे गांधी भवनात घेण्यात आलेल्या मतदारसंघनिहाय मुलाखती दुपारपर्यंत संपून गेल्या होत्या. औरंगाबाद पश्चिम व पूर्व वगळता अन्य मतदारसंघांसाठी इच्छुकांची संख्या मोठी नव्हतीच. त्यामुळेही मुलाखती लवकर संपल्या. शिवाय शक्तिप्रदर्शनाला वाव नव्हता. मुलाखतीसाठी उमेदवाराने स्वत: उपस्थित राहावे, समर्थकांना सोबत आणू नये, असे कळविण्यात आले होते. त्यामुळेही गांधी भवनात अनावश्यक गर्दी नव्हती, तसेच दोन-तीन मिनिटांतच मुलाखत देऊन उमेदवार बाहेर पडत होते. मोजकेच प्रश्न विचारले जात होते. त्यामुळेही मुलाखतींचा वेळ वाढत गेला नाही.
‘प्रचंड उत्साह आहे. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद आहे. विधानसभा निवडणुकीला काँग्रेस पक्ष सहर्ष सामोरा जाईल, असा विश्वास यानिमित्ताने निरीक्षक सचिन सावंत यांनी व्यक्त केला.मतदारसंघनिहाय वेळ ठरवून देण्यात आलेली होती. औरंगाबाद पूर्वपासून मुलाखती सुरू झाल्या. पश्चिम, मध्य मतदारसंघापर्यंतच्या मुलाखती संपल्यानंतर ग्रामीण भागातील मतदारसंघांसाठी इच्छुकांची संख्या मोठी नसल्यामुळे जे उमेदवार तेथे आले होते, त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
सचिन सावंत, कमल व्यवहारे या निरीक्षकांसह जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अनिल पटेल, शहराध्यक्ष नामदेव पवार, केशवराव औताडे, अशोक सायन्ना, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पानकडे, शहराध्यक्षा सरोज मसलगे पाटील, डॉ. जितेंद्र देहाडे, जयप्रकाश नारनवरे, रवी काळे, विलास औताडे, मुजफ्फर खान पठाण, यांच्यासह फ्रंटल आॅर्गनायझेशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
प्रकाश आंबेडकर सोबत आले नाहीत तरी लढू https://t.co/WlmRjgQiQk
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) July 31, 2019
मतदारसंघनिहाय इच्छुक उमेदवारांची नावे अशी
- औरंगाबाद पूर्व- मोहसीन अहमद, जीएसए अन्सारी, इब्राहिम पठाण, अहमद हुसेन, डॉ. सरताज पठाण, अशोक जगताप, सलीम अहमद खान, अफसर खान, युसूफ मुकाती.
- औरंगाबाद मध्य- युसूफ खान, मोहंमद अय्युब खान, मो. हिशाम उस्मानी, मसरूर खान, सागर मुगदिया.
- औरंगाबाद पश्चिम : डॉ. जितेंद्र देहाडे, साहेबराव बनकर, प्रदीप शिंदे, चंद्रभान पारखे, सचिन शिरसाठ, पंकजा माने, जयप्रकाश नारनवरे, राणुजी जाधव, सुनीता तायडे, तानाजी तायडे, एकनाथ त्रिभुवन, सुनीता कांबळे.
- पैठण- अनिल पटेल, विनोद तांबे, भाऊसाहेब भोसले, शेख तय्यब.
- गंगापूर- किरण पा. डोणगावकर, सय्यद कलीम, संजय जाधव, जगन्नाथ खोसरे.
- वैजापूर- पंकज ठोंबरे, प्रशांत सदाफळ.
- सिल्लोड- प्रभाकर पालोदकर, श्रीराम महाजन, कैसर आझाद, राजेश मानकर, भास्कर घायवट, सुनील काकडे.
- फुलंब्री- डॉ. कल्याण काळे, ताराबाई उकिर्डे, अनिल मानकापे पाटील.
- कन्नड- नामदेवराव पवार, संतोष कोल्हे, नितीन पाटील, अनिल सोनवणे, अशोक मगर, बाबासाहेब मोहिते.
अनेक इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी आलेले दिसले नाहीत. डॉ. कल्याण काळे हे निरीक्षक म्हणून अन्य जिल्ह्यांत गेले असल्याने ते मुलाखतीसाठी आले नव्हते.