पोलिसांनी तपास करून आरोपींना पकडले सुद्धा, परंतु जर पोलीस यंत्रणेने जागृत राहून काम केले असते तर कदाचित विकास चव्हाणला त्याचा जीव गमवावा लागला नसता, असा आरोप गोर बंजारा ब्रिगेडने केला आहे.
ज्या दिवशी विकासची हत्या झाली, त्या दिवशी मध्यवर्ती बसस्थानकामधील चौकीवर पोलीस तैनात होते किंवा नाही, पेट्रोलिंग करणारी गाडी रात्री का बस स्टॅन्डमध्ये गेली नाही, तेथे काही गुंड बसून गांजा किंवा नशा करतात हे पोलिसांना कसे कळले नाही. याबाबतचा तपास करावा व दोषी पोलिसांवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ब्रिगेडने केली.
पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांना भेटून यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी ब्रिगेडचे संस्थापक रविकांत राठोड, जिल्हा अध्यक्ष रविराज राठोड, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. मुकेश राठोड, शहराध्यक्ष पवन चव्हाण, शहर उपाध्यक्ष विकास राठोड, पैठण तालुका अध्यक्ष संजय पवार, सचिव संतोष राठोड हे उपस्थित होते.