लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांकडून कुरिअरद्वारे ज्यांनी शस्त्रे मागविली, अशा नागरिकांचे काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का, याची पडताळणी पोलीस करणार आहेत. याशिवाय शहरात किती कुरिअर सेवा आहेत आणि अशा कुरिअर सेवांमार्फत आणखी काही शस्त्रे यापूर्वी मागविण्यात आली आहेत का, याचीही पडताळणी करण्यात येणार आहे.शहरात कुरिअर सेवेमार्फत शस्त्रे आली. त्याच्या तपासासाठी दोन पथके बंगळुरू आणि राजस्थानला रवाना झाली आहेत. त्यांच्याकडून सविस्तर माहिती हाती आल्यावर कुरिअरच्या कार्यालयांची तपासणी होण्याची शक्यता आहे. शहरात नुकत्याच झालेल्या दंगलीत वापरण्यात आलेली शस्त्रे कुठून आली व त्याचा कुरिअर कंपन्यांशी काही संबंध आहे का, याचीही पडताळणी होणार आहे.मागील दोन वर्षांपासून चाकू, तलवारीने हल्ला, जिवे मारण्याचा प्रयत्न, असे अनेक गुन्हे आयुक्तालय हद्दीत दाखल आहेत. त्याचीही चौकशी पोलीस करणार आहेत. शहर गुन्हेगारीकडे वळत आहे काय आणि त्यास आळा घालण्यासाठी शस्त्र खरेदीवर कशा प्रकारे बंदी घालता येईल, याचाही विचार पोलीस विभागात होत असल्याची माहिती मिळाली.आॅनलाईन शस्त्र खरेदीवर बंदीचा विचारफ्लिपकार्टसारख्या कंपन्यांकडून आॅनलाईन होत असलेल्या शस्त्रांच्या विक्रीवर बंदी आणण्याबाबत पोलीस प्रशासन विचार करीत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव आमच्याकडे तयार असून, तो शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.-रामेश्वर थोरात, सहायक पोलीस आयुक्त
औरंगाबादेत शस्त्रे मागविणाऱ्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 11:54 PM
शहरात फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांकडून कुरिअरद्वारे ज्यांनी शस्त्रे मागविली, अशा नागरिकांचे काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का, याची पडताळणी पोलीस करणार आहेत. याशिवाय शहरात किती कुरिअर सेवा आहेत आणि अशा कुरिअर सेवांमार्फत आणखी काही शस्त्रे यापूर्वी मागविण्यात आली आहेत का, याचीही पडताळणी करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देशोधमोहीम : शहरात अवैध शस्त्रसाठा किती; पोलीस तपासणार