शिवना नदीवरील पुलावरुन औरंगाबाद, वैजापूरकडून जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. बारामती ॲग्रो युनिट- २ या साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणारी वाहने याच पुलावरुन धावत असतात. याशिवाय याच रस्त्यावर शहराजवळच तीन पेट्रोलपंप, शाळा आहे. या सर्वांचा एकत्रित विचार केल्यास या पुलावर मोठ्या संख्येने वाहनांची ये-जा सुरू असते. वाहन चालविताना या पुलावरील खड्डा चुकविणे ही वाहनचालकाची कसोटी आहे. त्यातच खड्डा चुकविताना समोरून येणारे किंवा पाठीमागून येणारे वाहन धडकून किंवा खड्डा चुकविताना वाहन घसरुन अपघात होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच हे खड्डे बुजविले नाही तर मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे खड्डे बुजवून भविष्यात होणारे अपघात टाळावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.
मकरणपूर पुलावरील खड्ड्यांचे अपघाताला निमंत्रण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 4:05 AM