परभणी : मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना आधार देण्यासाठी शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे कन्यादान सामूहिक विवाह सोहळा योजना सुरू केली असून त्याचा पहिला मान परभणी जिल्ह्याला मिळाला आहे. त्यामुळे हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जावून नागरिकांना निमंत्रण द्यावे व सोहळ्यात सहभागी करावे, असे आवाहन खा.बंडू जाधव यांनी केले.बाळासाहेब ठाकरे कन्यादान सामूहिक विवाह सोहळ्याच्या तयारीसाठी १८ फेब्रुवारी रोजी श्रीकृष्ण गार्डन येथे शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या सोहळ्यात जास्तीत जास्त २०० विवाह व्हावेत, या दृष्टीने काम करा, असे आवाहन खा.जाधव यांनी केले. शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, संजय कच्छवे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख सदाशिवराव देशमुख, मधुकर निरपणे, दशरथ भोसले, माणिक पोंढे, विष्णू मुरकुटे, काशिनाथ काळबांडे, हनुमंतराव पौळ, रवि धर्मे, विष्णू मांडे, रंगनाथ रोडे, रणजीत गजमल, भारत पवार, माजी आ.मीराताई रेंगे, हरिभाऊ लहाने, बाजार समितीचे सभापती बालासाहेब निरस, संतोष मुरकुटे, प्रभाकर वाघीकर, माधव कदम, सूर्यकांत हाके, बापुराव गमे, अनिल कदम, उत्तमराव कदम, अतुल सरोदे, अनिल डहाळे, ज्ञानेश्वर पवार, बंटी कदम, महेश जोशी, नंदू आवचार, विष्णू मस्के, राजेश कच्छवे, सखुबाई लटपटे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक आणेराव यांनी केले. ते म्हणाले, या सोहळ्याच्या संदर्भात सर्कलनिहाय मेळावे घेऊन जनजागृती केली आहे. २५० विवाह होतील, अशी अपेक्षा आहे, असे सांगितले. बाळासाहेब राखे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी सुभाष आहेर, गुणाजी आवकाळे, बालासाहेब घाटुळ, अंकुश मंडळकर यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)
घरोघरी जावून विवाह सोहळ्याचे निमंत्रण द्या
By admin | Published: February 18, 2016 11:33 PM