लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वैजापूर तालुक्यात वाळूच्या धंद्याला सध्या बरकत आली असून, यात पोलिसांचीच भागीदारी असल्याने या धंद्याला सुगीचे दिवस आले आहेत. कारवाई करणारी यंत्रणाच वाळूतस्करांच्या दावणीला बांधली गेल्याने शासनाचा दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.तालुक्यातील गोदावरी, शिवना नदीपात्रातून खुलेआम वाळू उपसा सुरू असून, याबाबत वैजापूर महसूल व पोलीस विभाग मात्र हातावर हात ठेवून गप्प आहेत. वाळूतस्करांवर कारवाई करणे गरजेचे असताना मुक्या अन् बहिºयावरच कारवाईचा बडगा उचलला जातो. या खेळातील राजा अन् वजीरच चोर असल्याने इतरांचे काय, असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.भालगाव, नागमठाण, चेंडूफळ, अव्वलगाव, पुरणगाव व लासूरगाव गोदापात्रात दररोज २५ ते ३० हायवा ट्रक व ट्रॅक्टरने वाळूचा उपसा सुरू असून, रात्रीच्या वेळी तस्करी करण्यात येते. यासाठी तालुक्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकाºयांना एका वाहनामागे २५ ते ५० हजार रुपये महिना वाळूमाफियांकडून देण्यात येतो. त्यामुळे तालुक्यात दररोज लाखो रुपयांची वाळूतस्करी राजरोस सुरू आहे. विशेष म्हणजे अवैध मार्गाने जमा होणारा महसूल शासनाच्या तिजोरीत न जाता वीरगाव, शिऊर व वैजापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांच्या खिशात जात आहे. या परिसरात श्रीरामपूर, कोपरगाव, गंगापूर व वैजापूर येथील वाळूतस्करांचे वाळू उपशावरून अनेक वेळा वाद उफाळून आले आहेत. वाढत्या पैशामुळे तस्करांनी या भागातील महसूल व पोलीस यंत्रणाच दावणीला बांधली का, असा संशय येत आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी वीरगाव व शिऊर पोलीस ठाण्याला आयएसओने सन्मानित करण्यात आले. असे असतानाही अवैध धंदे बंद होण्याऐवजी फोफावले आहेत. अवैध वाळूतस्करी रोखण्याची जबाबदारी महसूल व पोलिसांवर आहे; मात्र या धाडी टाकताना काही पोलीस कर्मचाºयांचे या धंदेवाईकांशी एवढे सलोख्याचे संबंध निर्माण झाले की, आता त्यांनीच भागीदारीत हा व्यवसाय सुरू केला आहे. अर्थात ही भागीदारी कुठेही रेकॉर्डवर नसल्याने कुणालाही सिद्ध करणे शक्य नाही; मात्र ही भागीदारी पोलीस खात्यात कुणापासूनच लपलेली नाही. खाकी वर्दीची भागीदारी असलेल्या या धंद्यांकडे धाडपथक सहसा जात नाही. काही पोलीस कर्मचाºयांनी आपले नातेवाईक व विश्वासू व्यक्तींच्या नावावर वाळूतस्करीसाठी वाहने घेतली आहेत. या वाहनातून अवैध वाळू वाहतूक सर्रास केली जाते. अन्य वाहनांना त्यापोटी हप्ता द्यावा लागतो; मात्र पोलिसांची वाहने म्हणून हप्ता घेतला जात नाही.विशेष पथकांचा सुळसुळाटवैजापूर तालुक्यातील अवैध धंदे रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी रस्त्यावर विशेष पथकांचा चांगलाच सुळसुळाट बघायला मिळतो; मात्र हा सुळसुळाट अवैध धंदे रोखण्यासाठी की चिरीमिरीसाठी, असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे. १० डिसेंबर रोजी नागमठाण व १३ डिसेंबरला भगूर फाट्याजवळ अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांच्या विशेष पथकाने पकडली; मात्र प्रत्येकी ४५ व ५५ हजार रुपये घेऊन परस्पर सेटलमेंट करीत वाहन सोडल्याची जोरदार चर्चा तालुक्यात आहे.४सुरुवातीला विशेष पथकाच्या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध धंदे बंद पडले होते; मात्र या पथकातील काही अधिकाºयांच्या छुप्या आशीर्वादाने अवैध धंदे रात्रीच्या वेळी राजरोस सुरू झाले आहेत. त्यांचा मूळ हेतू फक्त ‘अर्थकारण’ असल्याचे दिसून येते.हॉटेलमध्ये होते डीलिंग४वैजापूर तालुक्यात काही स्थानिक पोलीस कर्मचारी साहेबांच्या आशीर्वादाने बºयाच दिवसांपासून तालुक्यातील एकाच ठाण्यात ठाण मांडून बसलेले आहेत. स्थानिक पोलीस कर्मचाºयांना तालुक्याचा अनुभव जास्त असल्याने हप्ते गोळा करण्यासाठी अधिकाºयांनी यांनाच आपले ‘राइट व लेफ्ट हँड’ बनवले आहे. हे पोलीस शहरातील लक्ष्मी टॉकीजजवळ असलेल्या हॉटेलमध्ये दिवसभर बसून वाळूमाफियांसोबत डीलिंग करताना दिसतात.
वैजापुरात वाळूतस्करीत पोलिसांची भागीदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:06 AM