सफाई कर्मचाऱ्यांकडून आरोग्य केंद्रांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार बैठकीत मांडण्यात आली. तेव्हा जैस्वाल यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना बैठकीत बोलवून चांगले धारेवर धरले. तर अधिकाऱ्यांनीदेखील कर्मचाऱ्यांच्या कामाकडे लक्ष दिल्या गेले पाहिजे, अशा सूचना केल्या. दोन दिवसात जर केंद्रातील स्वच्छता झाली नाही. केंद्राच्या बागेला पाणी दिले गेले नाही, तर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
कोरोना संसर्गामुळे सर्वसामान्य जनता भयभीत झाली आहे. वाहेगाव, निधोना, वावना आरोग्य उपकेंद्रात ओपीडी चालू करा, नागरिकांना गावातच औषधोपचार मिळवून द्या, अशा सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या बैठकीला आरोग्य अधिकारी महेश चोपडे, प्रज्वल पाटील, किशोर काटकर, रमेश चव्हाण, विक्रम परदेशी, संजय भिवसने, संजय खरे, संगीता मैंद, अंजली कांबळे, कल्पना मसदे, करिष्मा चव्हाण, सुप्रिया खोब्रागडे यांची उपस्थिती होती.