शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

प्रचारात कचरा प्रक्रिया केंद्राचा मुद्दा; मतदारांना धूर, दुर्गंधीतून मुक्ती देण्याचा शब्द

By मुजीब देवणीकर | Published: November 11, 2024 11:59 AM

छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव येथील केंद्र टार्गेटवर

छत्रपती संभाजीनगर : शहरात दररोज ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कचऱ्यावर हर्सूल, पडेगाव आणि चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्रावर दररोज प्रक्रिया केली जाते. त्यानंतरही परिसरातील नागरिकांना १२ महिने दुर्गंधीचा असह्य त्रास सहन करावा लागतो. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दुर्गंधीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भविष्यात हे कचरा प्रक्रिया केंद्रच गायब केले जातील, असा शब्दही राजकीय नेत्यांकडून मतदारांना देण्यात येतोय हे विशेष.

महापालिका मागील ४० वर्षांपासून नारेगाव येथील खुल्या जागेवर कचरा टाकत होती. या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नव्हती. २०१७ मध्ये या भागातील नागरिकांनी कचरा टाकण्यास मज्जाव केला. त्यानंतर शहरात अभूतपूर्व अशी कचरा कोंडी निर्माण झाली. शहरातील मुख्य रस्त्यांवर कचऱ्याचे अक्षरश: मोठमोठे डोंगर साचले होते. महापालिका प्रशासनाने शहराच्या आसपास अनेक ठिकाणी पर्यायी जागांचा शोध घेतला. मनपाचे पथक जिकडे जात तिकडे नागरिक विरोध करीत. नेमके कचरा कुठे टाकावा, असा मोठा प्रश्न पडला. 

राज्य शासनाने या प्रकरणात हस्तक्षेप केला. शहरातच तीन ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय झाला. शासनाने मनपाला १४५ कोटी रुपयांचा विशेष निधीही दिला. या निधीतून सर्वप्रथम चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा केला. या प्रकल्पाला पंचक्रोशीतील शेतकऱ्यांकडून प्रचंड विरोध झाला. मनपाने शेतकऱ्यांच्या सर्व अटी मान्य करीत प्रकल्प सुरू केला. त्या पाठोपाठ पडेगाव येथील प्रकल्प उभा केला. येथे तर परिसरात दाट लोकवस्ती आहे, येथेच अनेकदा जुन्या कचऱ्याला आग लागते. धूर आणि दुर्गंधीचा प्रचंड त्रास नागरिकांना आहे. तिसरा शेवटचा प्रकल्प हर्सूल येथे दोन वर्षांपूर्वी सुरू झाला. नागरिकांचा विरोध आजही कायम आहे. उद्धवसेना, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी कचरा प्रक्रिया केंद्रांमधील दुर्गंधीचा मुद्दा प्रचारात आणला आहे.

मनपासमोर पर्याय नाहीमनपा दररोज कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करीत आहे. भविष्यात हे केंद्र स्थलांतरित करायचे म्हटले तर मनपाला अशक्यप्राय ठरणार आहे. प्रक्रिया केंद्रातील दुर्गंधी कमी करण्यावर प्रशासन काम करू शकते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमGarbage Disposal Issueकचरा प्रश्न