शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

‘...अन्यथा स्वप्नात आली होती चिऊताई’ असे म्हणावे लागेल !

By साहेबराव हिवराळे | Published: March 20, 2023 6:18 PM

२० मार्च जागतिक चिमणी दिवस : पाखरांच्या किलबिलाटाने सारेच प्रसन्न

छत्रपती संभाजीनगर : कडक उन्हाळा सुरू होत आहे. घरटी गायब झाल्याने पक्ष्यांसाठी पाणी, अन्न ठेवा... अन्यथा ‘स्वप्नात आली होती एक चिऊताई’ असेच चिमुकल्यांना सांगण्याची वेळ येऊ शकते.

गत दहा वर्षांपासून मोबाइलच्या लहरींमुळे ‘चिमणी पाखरं’ शहरातून छूमंतर होऊ लागली. परंतु, आता हळूहळू परत ती शहराच्या दिशेने येऊ लागली आहेत. तथापि, छतावरील पाण्याच्या टाक्यांना झाकण असते. त्यासह नळाची तोटीही बंद असते. यामुळे पाखरांना पाणी पिता येत नाही. म्हणून सामाजिक संघटना तसेच पक्षीप्रेमींनी शहरात अभियान राबवून ‘घराच्या छताला पाण्याचे भांडे लटकवा’ तसेच अंगणात पाणी, दाणे टाका, असे आवाहन केले आहे. चोचीत मावेल एवढाच घास घेऊन चिमणी चिव चिव करून पाणी पिऊन भुर्रर्र उडून जाते. हे पाहण्याचा आनंद काही निराळाच असतो. या पक्ष्यांच्या तृप्ततेतून मानवाला पुण्य व समाधानच मिळते.

चिमण्यांसाठी उभारले घरटं...शहरात चिमण्यांसाठी पाणी ठेवावे. घरातील कोणीतरी ही जबाबदारी घेतल्यास चिमण्यांचा चिवचिवाट निसर्गाशी एकरूपतेचा आनंद देईल.- सांडूजी गायकवाड, ज्येष्ठ नागरिक

भांडी मोफत देणार...दरवर्षी पक्ष्यांसाठी मातीची पाण्याची भांडी मोफत वाटण्याचे काम लाईफ केअर ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन करते. यंदा श्वान तसेच बेवारस जनावरांसाठीही विविध मोकळ्या जागांवर पाणी पिण्यासाठी भांडी ठेवली जाणार आहेत.- जयेश शिंदे (पक्षीप्रेमी)

अन्नसाखळीत पक्षी महत्त्वाचा घटकनिसर्गचक्रात विविध पक्षी, जीवजंतू हे अन्नसाखळीतील घटक मानले जातात. निसर्गातील बदल पक्ष्यांना अगोदर कळतात. बागेत तसेच दारात येणाऱ्या चिमण्या व पक्ष्यांना पाणी व अन्न द्या.- डॉ. किशोर पाठक , मानद वन्यजीव सदस्य

टॅग्स :environmentपर्यावरणAurangabadऔरंगाबाद