औरंगाबाद : बाजारात सीताफळापेक्षा सफरचंद स्वस्त झाले आहे. नेहमी एक किलो घेणारा ग्राहक भाव पाहून २ किलो सफरचंद घरी घेऊन जात आहे. चोखंदळ ग्राहक सीताफळ, पेरूसह हिवाळ्यात विविध फळांचा आस्वाद घेत आहेत. मात्र सीताफळ खाताना जरा सांभाळून; कारण, अति खाल्ल्याने कफ होऊ शकतो.
सफरचंद १०० रुपयांत २ किलोएरव्ही १०० ते २०० रुपये किलोने विक्री होणारे सफरचंद मागील महिनाभरापासून १०० रुपयांत २ किलो विकत आहे. काश्मिरी सफरचंदाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. जाधववाडीमधील अडत बाजारात दररोज ७ ते ८ ट्रक सफरचंद आवक होत आहे. दिल्लीहून हे सफरचंद येत आहेत. मोठ्या आकारातील लाल गडद सफरचंद घेतले तर दोन किलोत ३ ते ४ सफरचंद खराब निघत आहेत.
सीताफळ ७० ते ८० रुपये किलोएकीकडे सफरचंद १०० रुपयांत २ किलो विकत आहेत तर दुसरीकडे ७० ते ८० रुपये दरम्यान सीताफळे किलोभर मिळत आहेत.मागील वर्षीपर्यंत सीताफळापेक्षा सफरचंद महाग असे. यंदा मात्र सीताफळ सफरचंदापेक्षा जास्त भाव खात आहे. दररोज १० टन सीताफळांची अडत बाजारात आवक होत आहे.
३० रुपयात डझनभर केळीबाजारात ३० रुपयांत डझनभर केळी मिळतात. बहुतांश केळी कृत्रिमरीत्या पिकविली जात असल्याने केळीची गोडी निघून गेली आहे. यामुळे कच्ची केळी महाग असली तरी ती खरेदी करून घरी पिकविण्यास अनेक ग्राहक पसंती देतात.
सीताफळ अति खाणे टाळासीताफळ मर्यादित प्रमाणात खाल्लेतर आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र हिवाळ्यात जास्त खाल्ल्याने सर्दी, कफ होतो. फायबरचे प्रमाण जास्त असल्या कारणाने अधिक सेवनाने ॲसिडिटी, अतिसाराचा त्रास जाणवू शकतो. लोह प्रमाण अधिक असल्याने पोटदुखी, उलट्या होणे, मळमळ असेही प्रकार घडू शकतात.
सफरचंद,सीताफळ, पेरूवरच तावसकाळी फळे खावीत, असा डॉक्टर, आहारतज्ज्ञ सल्ला देतात. त्यात सफरचंद ५० ते ६० रु. किलो, ७० ते ८० रु. सीताफळ तर ५० रुपयांत पेरू मिळत आहेत. काही ग्राहक तिन्ही फळे खरेदी करत आहेत.- सलीमभाई, फळ विक्रेता