लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी ज्या शेतकºयांनी आधार क्रमांक दिले नाहीत, त्यांनी २ आॅक्टोबरपर्यंत बँकेत आधार क्रमांक जमा करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरु झाली आहे. शेतकºयांनी महा-ई सेवा केंद्रामार्फत आपले अर्ज दाखल केले आहेत. आता या अर्जांवर बँकामार्फत पुढील कार्यवाही होणार आहे. त्यामुळे ज्या शेतकºयांनी आपले आधारकार्ड बँकेत सादर केले नाहीत, त्या शेतकºयांनी १ व २ आॅक्टोबर रोजी ज्या बँकेतून कर्ज घेतले आहे, त्या बँक शाखेमध्ये आधारकार्ड जमा करणे आवश्यक आहे.आधारकार्ड बँकेत सादर न केल्यास संबंधित शेतकºयाच्या कर्जमाफीचा निर्णय तात्पुरता स्थगित ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. १ व २ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील भारतीय स्टेट बँक व इतर बँकांच्या शाखा सुरु राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी पी.शिव शंकर, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी राम खरटमल यांनी दिली आहे.
कर्जमाफीसाठी सोमवारपर्यंत आधारकार्ड दाखल करणे बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:48 AM