शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

महावीर चौक ते केंब्रिज चौकापर्यंत एकच उड्डाणपूल तयार करता येईल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2021 7:32 PM

Testing of single flyover in Aurangabad : प्रत्येक पुलाच्या उताराचा भाग कापून त्या ठिकाणी नवीन कॉलम उभारून एकच पूल करणे शक्य आहे का, याचे सर्वेक्षण लवकरच करण्यात येईल.

ठळक मुद्देतांत्रिक तपासणी होणार असल्याची खासदार इम्तियाज जलील यांची माहिती विमानतळासमोरील उड्डाणपूल अखेर रद्द करण्यात आला आहे मुंबई, पुणे, नाशिक, हैदराबाद आणि अहमदनगरमध्येसुद्धा लांबलचक एकच पूल

औरंगाबाद : जालना रोडवर चिकलठाणा विमानतळासमोर बांधण्यात येणारा उड्डाणपूल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadakari ) यांनी रद्द केला आहे. महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) ते केंब्रिज शाळेपर्यंत एकच उड्डाणपूल उभारता येईल का, याची तांत्रिक तपासणी एका महिन्यात करावी, असे आदेशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्याची माहिती खा. इम्तियाज जलील ( Imtiaz Jalil ) यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. (Is it possible to build a single flyover from Mahavir Chowk to Cambridge Chowk in Aurangabad ?)

गडकरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा तपशील जलील यांनी दिला. जालना रोडवर तीन उड्डाणपूल आहेत. प्रत्येक पुलाच्या उताराचा भाग कापून त्या ठिकाणी नवीन कॉलम उभारून एकच पूल करणे शक्य आहे का, याचे सर्वेक्षण लवकरच करण्यात येईल. शेंद्रा पंचतारांकित वसाहतीत भविष्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी हे खूप फायदेशीर ठरेल. मुंबई, पुणे, नाशिक, हैदराबाद आणि अहमदनगरमध्येसुद्धा लांबलचक एकच पूल उभारण्यात आला आहे. मग औरंगाबादेत का नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. एकच उड्डाणपूल उभारण्यासाठी राज्य सरकार आणि विशेषत: महानगरपालिकेने (Aurangabad Municipal Corporation ) सहकार्य करणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.

ऐतिहासिक बाग बनतेय ‘हिमायत बार’; ३०३ बॅाटल आणि १५० किलो प्लास्टिक रॅपर जमा

लोकसभेतील कामकाज होण्याच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त करताना सत्ताधारी आणि विरोधक यांचा हा गेम प्लॅन असल्याचा आरोप खा. जलील यांनी केला. अनेक गंभीर विषयांवर सरकारला सळो की पळो करून सोडता येईल. पण विरोधकांच्या गोंधळाचा फायदा सरकारला होतोय. एक अधिवेशन चालविण्यासाठी किमान २०० काेटी रुपये खर्च येतो. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा चेंडू केवळ एकमेकांना टोलावण्याचा उद्योग सत्ताधारी आणि विरोधक करीत आहेत. मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण द्यावे, हे न्यायालयाने म्हटले आहे. मग त्याची अंमलबजावणी का होत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

त्या सदस्याने नाव कोणी वगळलेराज्य सेवा परीक्षा आयोगावर (एमपीएससी) ज्या सदस्यांची निवड केली त्या यादीत एका तज्ज्ञ मुस्लिम व्यक्तीचाही समावेश होता. त्याचे नाव कोणी वगळले याचा खुलासा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करावा, अशी मागणीही त्यांनी केली. उत्तर प्रदेशच्या आगामी निवडणुकीत आम्ही कोणासोबतही जाणार नाही. उलट आमच्यासोबत कोणी आले तर विचार करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय वक्फ समितीची ‘नौटंकी’केंद्रीय वक्फ समितीचे सदस्य शहरात आल्याबद्दल खा. जलील यांना छेडले असता त्यांनी प्रचंड आगपाखड केली. केंद्रीय सदस्यांची ही निव्वळ ‘नौटंकी’असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNitin Gadkariनितीन गडकरीImtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका