लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत औरंगाबाद मार्गावर सुरु असलेल्या आयेशाकिरण टाऊनशिपला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली.यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, विभागीय आयुक्त डॉ. पुरु षोत्तम भापकर, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, आयेशा टाऊनचे संचालक धीरेंद्र मेहरा, शैलेंद्र मेहरा, अमोल महाजन आदींची उपस्थिती होती.प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत जालना शहरालगत आयेशा टाऊनशिप प्रकल्प साकारला जात आहे. या ठिकाणी २६६ सदनिकांची उभारणी करण्यात येत असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर नमुना सदनिकेचे उदघाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयेशा टाऊनशिप यांच्यामार्फत गरीबांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीच्या घरांची उभारणी करण्यात येत असल्याचे सांगत जिल्ह्यात गरिबांसाठी अशा पद्धतीच्या घरांची मोठ्या प्रमाणात उभारणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आयेशाकिरण गृहप्रकल्प मॉडेल ठरणार
By admin | Published: May 14, 2017 11:42 PM