औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात पुरेशा प्रमाणात खाटा उपलब्ध ठेवण्यासाठी प्रशासनाने यंत्रणांना सूचना केल्या आहेत.
शहरी भागात सीसीसी, डीसीएच आणि डीसीएचसी या उपचार सुविधांमध्ये एकूण ६०१४ खाटा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत, तर ग्रामीण भागात सीसीसीमध्ये १२४४, डीसीएचसीमध्ये २२५ खाटा उपलब्ध आहेत. तसेच वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात अतिरिक्त उपचार सुविधा, खाटांची उपलब्धता प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक आहे की नाही, याची शहानिशा करण्यासाठी शहरी भागासाठी डॉ. बासीत अलीखान यांना ९३२६७८९००७, पीयुष राठोड यांच्याशी ८८३००६१८४६, ८८५५८७६६५४ क्रमांकावर संपर्क करता येईल. तसेच ग्रामीण भागात खाटा उपलब्ध आहेत की नाहीत, यासाठी डॉ. कुडीलकर यांना ९४२०७०३००८ यावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
होम आयसोलेशनचाही वाढतोय आकडादिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने होम आयसोलेशनमधील रुग्णांचाही आकडा वाढत चालला आहे. रविवारच्या प्राप्त अहवालानुसार, शहरात तब्बल २,५०० रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत.