शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

ऐकावे ते नवलच ! 'येथे' नवरदेवाचे कपडे विकत घेतले जातात; ‘ब्लेझर’ नव्हे तर ‘शेरवानी’ला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2022 8:05 PM

घरात पडून राहण्यापेक्षा शेरवानी विकून टाकण्याचा ट्रेंड वाढू लागला आहे.

- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : ‘आमच्या येथे नवरदेवाचे कपडे विकत मिळतील’ अशा पाट्या आपण अनेक दुकानांत पाहिल्या असतील, आता ‘येथे नवरदेवाचे कपडे विकत घेतले जातील’ अशा पाट्या नजरेस पडल्या तर नवल वाटायला नको. कारण, आता असा व्यवसाय शहरात सुरू झाला आहे.

हे वाचल्यानंतर ‘ऐकावे ते नवलच’ असे शब्द नकळत तुमच्या तोंडून बाहेर पडले असतील. मात्र, मुंबई, पुणे, बंगळुरू अशा मोठ्या शहरांत नवरदेवाने लग्नात एकदाच वापरलेला पोशाख खरेदी करण्याचा व्यवसाय मागील ५ वर्षांत जोमात वाढला. औरंगाबादमध्ये मागील २ वर्षांपासून म्हणजे कोरोना काळापासून नवरदेवाचे कपडे खरेदी करण्यास सुरुवात झाली.

कपडे विकत घेणारे ‘शेरवानी’ला प्राधान्य देतात. कारण, शेरवानी सर्वांत महाग असते. भरजरी शेरवानी लग्नाच्या दिवशी किंवा स्वागत सोहळ्याच्या दिवशी नवरदेव हौशीने परिधान करतात व नंतर आयुष्यभर ती शेरवानी कपाटात पडून राहते. कोट, ब्लेझर अन्य कार्यक्रमात, ऑफिसमध्ये वापरले जातात. त्यामुळे घरात पडून राहण्यापेक्षा शेरवानी विकून टाकण्याचा ट्रेंड वाढू लागला आहे. कारण आता नाटके, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी कॉश्च्युम भाड्याने देणारेच शेरवानी विकत घेत आहेत. महिना ते एक वर्ष जुनी शेरवानी व्यापारी खरेदी करतात. कारण, दरवर्षी शेरवानीमध्ये ट्रेण्ड बदलतो आहे.

मिळते १० टक्के रक्कम१५ हजार रुपयांत खरेदी केलेली शेरवानी विकल्यास त्याचे १० टक्के म्हणजे जेमतेम १५०० रुपये मिळतात. एकदा शेरवानी वापरली की त्याची किंमत मार्केटच्या भाषेत थेट ९० टक्क्यांनी कमी होते.

आयटी क्षेत्र व एनआरआय नवरदेवही विकतात शेरवानीदुकानदारांनी सांगितले की, शेरवानी विकायला येणाऱ्यांमध्ये आयटी क्षेत्रातील नवरदेव, एनआरआयची संख्या जास्त असते. कारण ‘युज अँड थ्रो’ ट्रेंड व दुसरे या लोकांना ब्लेझर, कोट-सूटमध्ये नेहमी वावरावे लागते. लग्नानंतर शेरवानी घालण्याचे काम पडत नाही.

भाड्याच्या ड्रेसवर लग्न५० जणांत लग्न लावायचे तर एका दिवसासाठी महागडे कपडे विकत घेण्याऐवजी भाड्याची शेरवानी घेणारे कमी नाहीत, असे व्यापाऱ्यांनी नमूद केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक