विजय मुंडे । लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णाला सोलापूर रेफर करण्याची वेऴ़़ नातेवाईकांनी १०८ ला केलेला फोऩ़़ संबंधितांनी अॅब्युलन्स हवी असेल तर जिल्हा शल्यचिकित्सकांचे (सीएस) पत्र आणा, असा नियमांना धरून दिलेला जीवघेणा सल्ला़़़ उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना न मिळणारे स्ट्रेचर आणि पाण्याची बोंब असा संतापजनक प्रकार शनिवारी रात्री जिल्हा रुग्णालयात पहावयास मिळाला़ शनिवारी रात्री १०़३० ते मध्यरात्री १़१५ या कालावधीत जिल्हा रुग्णालयात चालणाऱ्या रुग्णसेवेच्या कामाची ‘लोकमत’ प्रतिनिधीने पाहणी केली़ ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या या रुग्णालयाचे बहुतांश काम हे रुग्णांसह नातेवाईकांनाही त्रासदायक असेच दिसून आले़ रात्री १०़३० च्या वेळी जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातील पोर्चमध्ये प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांचे नातेवाईक चिंताग्रस्त थांबले होते़ अनोळखी प्राण्याचा दंश झाल्याने राजाराम हावळे (वय-५५़ रा़ बोरी ता़तुळजापूर) यांची प्रकृती गंभीर झाली होती़ त्यांना सोलापूरला रेफर करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला होता़ प्रारंभी नातेवाईकांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला कॉल केला़ त्यावेळी ‘सीव्हील मधील रुग्ण सोलापूरला न्यायचा असेल तर सीएसचे पत्र आणा, डीएमओचे पत्र आणा’ असा सल्ला देण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले़ दुसरीकडे जिल्हा रुग्णालयाची एकही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती़ त्यावेळी हतबल झालेल्या नातेवाईकांना एका खासगी दवाखान्याची रुग्णवाहिका बोलवावी लागली़ रुग्णाला सोलापूरला रेफर करण्यासाठी व्हेंटीलेटर असलेल्या खासगी रुग्णवाहिकेचे ७५०० रुपयांचे भाडे भरण्याची वेळ नातेवाईकांवर आली!प्रवासी वाहतूक रिक्षामधून रात्री साधारणत: ११़३० वाजण्याच्या सुमारास एका वयोवृद्ध महिलेला रुग्णालयात आणण्यात आले होते़ वयोवृद्ध महिला रुग्ण असतानाही एकाही कर्मचाऱ्याने त्यांच्यासाठी स्ट्रेचर किंवा व्हिलचेअर आणली नाही़ नातेवाईकांनीच रुग्ण महिलेला हाताला धरून उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले़ असाच प्रकार रात्री १२़१४ वाजता दिसून आला़ तालुक्यातील शिंदेवाडी येथील अंजना गुजरे (वय-६५) या महिलेच्या छातीत दुखू लागल्याने सीव्हीलमध्ये आणले होते़ विव्हळणाऱ्या महिलेला पोर्चमधून डॉक्टरांकडे नेण्यासाठी स्ट्रेचर, व्हीलचेअरची सोय एकाही कर्मचाऱ्याने केली नाही़ परिणामी नातेवाईकांनीच त्या महिलेला डॉक्टरांकडे नेऊन उपचार घेतले़धगधगत्या उन्हामुळे घशाची तहान जाता जात नाही़, असे असताना रुग्णालय परिसरात असलेल्या टाकीतून गरम पाणी मिळत होते़ वॉर्डा-वॉर्डात ठेवलेल्या टाक्यांपैैकी अनेक टाक्या कोरड्याठाक पडल्या होत्या़ विशेष म्हणजे या रुग्णालयात असलेले वॉटरकुलर तर भंगारात घालण्याच्या अवस्थेत पडल्याचे दिसून आले़ त्यामुळे गरम पाणी पिऊनच रात्र काढण्याची वेळ नातेवाईकांवर आली होती़ इतर वॉर्डामधील अधिकारी, कर्मचारी रुग्णांना सुरळीत सेवा देताना दिसून आले़
इथे अंधाऱ्या रात्री चुकतो काळजाचा ठोका!
By admin | Published: May 08, 2017 12:20 AM