शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

आग लागल्यावर उडी मारण्याचीच येईल वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 11:33 PM

सुरतप्रमाणे एखाद्या वेळी अचानक आग लागली, तर जीव वाचविण्यासाठी इमारतीवरून उडी मारण्याचीच वेळ विद्यार्थ्यांवर ओढावू शकते, इतकी धोकादायक अवस्था शहरातील अनेक खासगी शिकवणी वर्गांची आहे. दुसऱ्या, तिसºया मजल्यावर वर्ग, त्यासाठी ये-जा करण्यासाठी एकच मार्ग आणि अग्निशमन यंत्रणेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा जीव टांगणीला : खासगी शिकवण्यांची धोकादायक अवस्था, अग्निशमन यंत्रणेचा अभाव, ‘नाहरकतही नाही

संतोष हिरेमठऔरंगाबाद : सुरतप्रमाणे एखाद्या वेळी अचानक आग लागली, तर जीव वाचविण्यासाठी इमारतीवरून उडी मारण्याचीच वेळ विद्यार्थ्यांवर ओढावू शकते, इतकी धोकादायक अवस्था शहरातील अनेक खासगी शिकवणी वर्गांची आहे. दुसऱ्या, तिसºया मजल्यावर वर्ग, त्यासाठी ये-जा करण्यासाठी एकच मार्ग आणि अग्निशमन यंत्रणेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले.गुजरातची आर्थिक राजधानी असलेल्या सुरतमध्ये शुक्रवारी खासगी शिकवणी वर्गामध्ये झालेल्या अग्निकांडात २० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. चार मजली इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. तळमजल्यावर लागलेली आग पाहून विद्यार्थ्यांनी वरच्या मजल्याकडे धाव घेतली. आग नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी चौथ्या मजल्यावरून उड्या मारून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांतील खासगी शिकवणी वर्गांच्या इमारतींची पाहणी करण्यात आली. तेव्हा अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याची धक्कादायक बाब आढळून आली.शहरात पाहणी केलेल्या बहुतांश शिकवण्या दुसºया आणि तिसºया मजल्यावर होत्या. विशेष म्हणजे प्रत्येक इमारतींना ये-जा करण्यासाठी एकच जिना आहे. त्यामुळे खालच्या मजल्यावर आग लागल्यानंतर वरच्या मजल्यावरील वर्गामधील विद्यार्थी अडकून पडण्याचीच भीती आहे. त्यातून जीव वाचविण्यासाठी उडी मारण्याचा एकमेव पर्याय आहे. याबरोबर खासगी शिकवण्यांमध्ये दर्शनी भागात अग्निशमन सिलिंडर दिसून आले नाहीत. त्यामुळे आगीच्या लहानही घटनेवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी मोठी धावपळ उडू शकते.ये-जा करण्यासाठी एकच मार्गशहरातील उस्मानपुरा भागात संत एकनाथ रंगमंदिराच्या परिसरात एकाच इमारतीत दुसºया मजल्यावर समोरासमोर दोन वर्ग आहेत. खालच्या इमारतीला जर आग लागली तर विद्यार्थ्यांना खिडक्यांमधून उड्या मारून जीव वाचवावा लागेल. कारण याठिकाणी ये-जा करण्यासाठी एकच मार्ग आहे. महेशनगर, औरंगपुरा व अन्य भागातील खासगी शिकवणी वर्गांची अवस्थाही अशीच काहीशी पाहायला मिळाली. मराठवाडा साहित्य परिषदेच्या परिसरातील एका इमारतीत दुसºया मजल्यावरील शिकवणीमध्ये तर विद्युत वाहिन्या धोकादायकरीत्या उघड्या दिसून आल्या.इमारतीची वाईट अवस्थाअग्रसेन चौक रस्त्यावर दोन खासगी शिकवणी वर्ग आहेत. यापैकी दुसºया मजल्यावरील शिकवणी वर्गांच्या इमारतीची अतिशय वाईट अवस्था दिसून आली. शिकवणीच्या खालच्या मजल्यावर जुन्या खुर्च्या, खोकी असे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. जिन्यावरूनच विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागते. काही कारणांमुळे खालच्या मजल्यास आग लागली तर येथील विद्यार्थ्यांना गॅलरीतून जीव वाचविण्याचा एकच मार्ग राहील.४० पेक्षा अधिक शिकवण्या, नोंद फक्त दोनचीशहरात ४० पेक्षा अधिक खासगी शिकवणी वर्ग आहेत. परंतु त्यांनी मनपाच्या अग्निशमन विभागाकडून आगीसंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही. केवळ नियोजित असलेल्या दोन शिकवण्याच्या इमारतीच्या नाहरकतसाठी नोंद झालेली आहे. खासगी शिकवणी वर्गाला परवानगी देण्याची जबाबदारी ही कामगार उपायुक्त कार्यालय आणि शिक्षणाधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे खासगी शिकवणी वर्गाच्या नावाने नाहरकत दिलेली नसल्याचे म्हणत अग्निशमन विभागाच्या अधिकाºयांनी हात वर केले. शहरात शाळा, महाविद्यालय अशा सुमारे १४८ शैक्षणिक संस्था आहेत. त्यांना नाहरकत देण्यात आली आहे. परंतु त्यातही ८० पेक्षा अधिक संस्थांनी त्या नूतनीकरणाकडे दुर्लक्ष केले आहे.सोमवारपासून नोटीस बजावणारखासगी शिकवणीला शिक्षणाधिकारी, कामगार उपायुक्त कार्यालयाकडून परवानगी देण्यात येते. शिवाय इमारत बांधताना तेथे खासगी शिकवणी वर्ग चालतील, असे सांगितले जात नाही. त्यामुळे शिकवणीच्या नावाने नाहरकत नाही. फक्त नियोजित दोन खासगी शिकवणीची नोंद झालेली आहे. सोमवारपासून शहरातील खासगी शिकवणीला नोटीस बजावल्या जातील.- आर. के. सुरे, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणStudentविद्यार्थीfireआग