छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील युवक-युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करून विविध क्षेत्रांत ‘रोजगार आणि स्वयंरोजगारा’च्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियाना’अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम २०२३-२४ या योजनेंतर्गत पात्रताधारक या इच्छुक असलेल्या युवक-युक्तींना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यात कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्याकरिता शासनाकडून प्रशिक्षण संस्थांची प्रशिक्षण केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे.
कोणकोणते कोर्स?बिझनेसपासून ते प्लंबर आणि मिस्त्रीपासून ते मशीन शाॅप, मशीन ऑपरेटर असिस्टेंट इंजेक्कान मोल्डिंग, मशीन ऑपरेटर असिस्टंट प्लास्टिक प्रोसेसिंग, बिझनेस करस्पॉन्डंट आणि बिझनेस फॅसिलिटेटर, डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर, फिटर फॅब्रिकेशन, फील्ड टेक्निशियन एअर कंडिशनर, ऑटोमोटिव्ह वेल्डिंग मशीन ऑपरेटर, मोबाइल फोन हार्डवेअर दुरुस्ती तंत्रज्ञ, इलेक्ट्रिशियन घरगुती उपाय, सीएनसी प्रोग्रामर, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, ऑटोमोटिव्ह पेल्टिंग मशीन ऑपरेटर, ऑटोमोटिव्ह असेंब्ली ऑपरेटर, हेडहेल्ड उपकरणे हिंडसेट आणि टॅब्लेट) तंत्रज्ञ, सीएनजी ऑपरेटर टर्निंग, सोलार पीव्ही इंस्टॉलर (सूर्यमित्र), ऑटोमोटिव्ह प्रेस शॉप तंत्रज्ञ, असे विविध कोर्स युवक-युवतीसाठी मोफत ठेवण्यात आले आहेत.
ऑनलाइन युवकांनी नोंदणी करून फायद्या घ्या...फक्त शिक्षण घेऊनच नव्हे, तर तांत्रिक शिक्षणाची जोड हवी. ग्रुप इंटरव्ह्यूचा फायदा घेण्यासाठी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. युवक-युवतींनी नोकरीच्या शोधात राहावे, म्हणून चांगला जॉब मिळण्यासाठी फायदा घ्यावा.- प्रेम चव्हाण, कामगार नेते
शासनाची मोफत योजना...या अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यामध्ये किमान कौशल्य विकास कार्यक्रमात २०२३-२४ करिता १२०० उमेदवारांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात ऑनलाइन अर्ज करा किंवा प्रत्यक्ष भेट देऊन अर्ज भरावा. इयता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण आहे.- सुरेश वराडे, सहायक आयुक्त