शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

जय गणेश! गणपती बसवा अन् पाच लाखांचा पुरस्कार मिळवा!

By प्रशांत तेलवाडकर | Published: August 14, 2024 1:10 PM

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा

छत्रपती संभाजीनगर : श्रावणाला सुरुवात होताच सर्वांना लाडक्या बाप्पांच्या आगमनाचेही वेध लागले आहेत. सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते आता तयारीला लागले आहेत. त्यांचा उत्साह आणखी द्विगुणित करण्यासाठी यंदा शासनाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४’ची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे, राज्यातील प्रथम विजेत्या गणेश मंडळाला ५ लाखांचे बक्षीस मिळणार आहे.

कोणते सार्वजनिक गणेश मंडळ सहभागी होऊ शकतेनोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धा नि:शुल्क आहे.

निकष काय असणार१) सार्वजनिक गणेश मंडळाकडून सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन.२) संस्कृतीचे जतन व संवर्धनासाठी राबविण्यात आलेले उपक्रम.३) गडकिल्ले, राष्ट्रीय व राज्य स्मारके यांचे जतन व संवर्धन.४) धार्मिक स्थळांविषयी जनजागृती, जतन व संवर्धन.५) विविध सामाजिक उपक्रम व कार्य.६) पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट.७) ध्वनिप्रदूषणरहित वातावरण.

निकषांच्या आधारे परीक्षणगणेशभक्तांसाठी केलेल्या सोयी-सुविधांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि तसेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक राबवले जावेत, म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार दिला जाणार आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण करण्यात येणार आहे.

असे मिळतील पुरस्कारराज्यस्तरीय परीक्षणात प्रथम पारितोषिक पटकाविणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळास ५ लाखांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाला २ लाख ५० हजार रुपये तर तृतीय क्रमांकाला १ लाख रुपयांचे पारितोषक व प्रमाणपत्र, जिल्हास्तरावर प्रथम विजेत्यांना २५ हजारांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख कधीराज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ आहे. भरलेला अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर पाठवावा.

कोण करणार परीक्षणगणेशोत्सवाची सुरुवात ७ सप्टेंबरपासून होत आहे. यानिमित्त आयोजित स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या परीक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने एक जिल्हास्तरीय समिती गठित केली जाईल. ही समिती जिल्ह्यातील मंडळांना भेट देऊन त्यांचे परीक्षण करेल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGanpati Festivalगणेशोत्सव