लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जायकवाडी धरणात गतवर्षीच्या तुलनेत आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला यंदा २० टक्क्यांनी कमी पाणीसाठा आहे. आगामी काही दिवसांत मोठा पाऊस पडला नाही, तर जायकवाडीतील पाणीसाठा चिंतादायक ठरू शकतो.पावसाने दडी मारल्याने ३ आॅगस्टपासून जायकवाडी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. सध्या डाव्या कालव्यातून ५०० अणि उजव्या कालव्यातून ८०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा २ आॅगस्ट रोजी ३२.११ टक्के होता. शनिवारी (दि.४) हा पाणीसाठा ३१.८७ टक्क्यांवर आला. गतवर्षी म्हणजे ४ आॅगस्ट २०१७ रोजी हाच पाणीसाठा ५२.२० टक्क्यांवर होता. वर्षभरापूर्वी धरण अर्धे भरलेले होते; परंतु सध्या मागील वर्षापेक्षा २०.३३ टक्के कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.जायकवाडीच्या लाभक्षेत्रात गेल्या १८ दिवसांपासून समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे या भागातील पिकांवर संकट निर्माण झाले. खरिपाच्या पिकांना जीवदान मिळावे, यासाठी जायकवाडीच्या लाभक्षेत्रातून त्वरित पाणी सोडण्याची मागणी लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांकडून करण्यात आली. कडा प्रशासनाने खरिपाची एक पाणीपाळी देण्याचा प्रस्ताव तयार केला होता. प्रस्तावाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मान्यता दिली आणि शुक्रवारी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. हे आवर्तन २१ दिवसांचे राहणार आहे. यात डाव्या कालव्यातून ८० दलघमी आणि उजव्या कालव्यातून २० दलघमी इतके पाणी सोडण्यात येत आहे.पाण्याचे नियोजनजायकवाडीच्या डाव्या कालव्यातून ५०० आणि उजव्या कालव्यातून ८०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. साधारण साडेतीन टीएमसी पाणी शेतकºयांना मिळणार आहे. जायकवाडीतील एकीकडे पाणीसाठा कमी होण्याची चिंता व्यक्त होत आहे. दुसरीकडे पिकांना जीवदान मिळेल, असे समाधान शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.
जायकवाडीत गतवर्षीपेक्षा २० टक्क्यांनी कमी पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 12:40 AM
जायकवाडी धरणात गतवर्षीच्या तुलनेत आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला यंदा २० टक्क्यांनी कमी पाणीसाठा आहे. आगामी काही दिवसांत मोठा पाऊस पडला नाही, तर जायकवाडीतील पाणीसाठा चिंतादायक ठरू शकतो.
ठळक मुद्देचिंता : दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तने; गेल्या १८ दिवसांपासून पावसाने फिरविली पाठ