शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

जायकवाडी ९० टक्क्यांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 8:15 PM

जायकवाडीची पाणीपातळी ९० टक्क्यांपेक्षा पुढे सरकल्याने येत्या ४८ तासांत धरणातून विसर्ग केल्या जाण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली. सायंकाळी धरणात २६६९.७३७ दलघमी एकूण जलसाठा झाला होता. यापैकी १९३१.६३१ दलघमी जीवंत जलसाठा आहे.

ठळक मुद्दे४८ तासांत पाणी सोडण्याची शक्यता

पैठण (जि. औरंगाबाद) : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे सकाळपासून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडीची पाणीपातळी ९० टक्क्यांपेक्षा पुढे सरकल्याने येत्या ४८ तासांत धरणातून विसर्ग केल्या जाण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली. सायंकाळी धरणात २६६९.७३७ दलघमी एकूण जलसाठा झाला होता. यापैकी १९३१.६३१ दलघमी जीवंत जलसाठा आहे.मंगळवारी नाशिक व नगर जिल्ह्यास पावसाने झोडपले. यात करंजवन ४८ मि.मी., गंगापूर ११४ मि. मी., दारणा २४ मि. मी., भंडारदरा ९५ मि.मी., पालखेड ३८ मि.मी., निळवंडे ८३ मि. मी., नाशिक १८ मि.मी., कन्नड १८ मि. मी., कोतूळ ४५ मि.मी., राहुरी २६ मि. मी., राहाता २८ मि.मी., शिर्डी २८ मि. मी., पिंपळगाव बसवंत ५६ मि.मी., इगतपुरी ८३ मि.मी., घोटी ७३ मि.मी., त्र्यंबकेश्वर ६०  मि.मी, विंचूर २८ मि.मी, आढळा ४५ मि.मी, कश्यपी ७२ मि.मी, गौतमी ६३ मि.मी, कडवा २८ मि.मी, भावली ६८ मि.मी, व वाकी ६५  मि.मी अशा जबरदस्त पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सुध्दा पाणलोट क्षेत्रात विविध ठिकाणी पाऊस सुरू होता. यामुळे काठोकाठ भरलेल्या नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांपैकी दारणा ४३१६, गंगापूर २७४२, पालखेड १७३२ क्युसेक विसर्ग करण्यात येत असून हे सर्व पाणी नांदूर मधमेश्वर बंधाºयातून गोदावरी पात्रात १८९३० क्युसेक क्षमतेने सोडण्यात येत आहे.अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातून २२७७५, भंडारदरा धरणातून ५६७३ क्युसेक असा विसर्ग सुरू असून हे सर्व पाणी ओझर वेअर बंधाºयात जमा होते. ओझर वेअर बंधाºयातून प्रवरेच्या पात्रात १३००० क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात येत आहे. गोदावरी व प्रवरा नदीपात्रातून ३१९३० क्युसेक पाणी जायकवाडी धरणाकडे झेपावले आहे.  बुधवारी धरणात ६२०६ क्युसेक क्षमतेने आवक सुरू होती. बुधवारी मध्यरात्रीनंतर हे पाणी जायकवाडी धरणात दाखल होणार असल्याचे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.जायकवाडी धरणात फक्त दोन फूट जागा१५२२ फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी बुधवारी १५२० फूट झाली आहे. धरणात आता फक्त दोन फूट जागा शिल्लक राहिली आहे. यामुळे उर्ध्व भागातून येणारी आवक, पूर नियंत्रणासाठी राखीव ठेवावे लागणारे पॉकेट, नियंत्रित विसर्ग करण्याच्या दृष्टिकोनातून आवक लक्षात घेता येत्या ४८ तासांत जायकवाडी धरणातून विसर्ग करणे अनिवार्य आहे. पाणी सोडण्याबाबत  बुधवारी दिवसभर जायकवाडी प्रशासनाच्या प्राथमिक हालचाली सुरू होत्या.व्यापारी सतर्क२००६ ला जायकवाडी धरणातून २५०००० क्युसेक क्षमतेने जायकवाडी धरणातून विसर्ग करण्यात आला होता.  ६ आॅगस्ट ते ११ आॅगस्ट २००६ या दरम्यान पैठण शहर जलमय झाले होते. याचा सर्वाधिक फटका शहरातील व्यापाºयांना सोसावा लागला होता. त्यातच अनेक विमा कंपन्यांनी हात वर केल्याने व्यापाºयांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही पाणी सोडणार असल्याने व्यापाºयांना भितीने ग्रासले असून व्यापारी जायकवाडी प्रशासनाच्या संपर्कात आहेत.