शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

जायकवाडी धरणात 67 टक्के पाणीसाठा; ३१ हजार क्युसेकने आवक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 9:25 PM

धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता फक्त ६.३३ फूट पाण्याची गरज आहे.

औरंगाबाद : जायकवाडी धरणात आज अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून विसर्ग सुरू असल्याने ३१०३८ क्युसेक्स आवक सुरू होती. सायंकाळी ७ वा धरणाचा जलसाठा ६७.१६ टक्के झाला होता. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता फक्त ६.३३ फूट पाण्याची गरज आहे. धरणात आवक कमी झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत आज गेल्या दोन दिवसाच्या मानाने संथगतीने वाढ झाली.

नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर वेअर मधून गोदावरी पात्रात आज २९५९४ क्युसेक व अहमदनगर जिल्ह्यातील ओझर वेअर मधून ९७६९ क्युसेक विसर्ग सुरू होता. हे पाणी जायकवाडी धरणात ३१०३८ क्युसेक क्षमतेने दाखल होत होते.

१५२२ फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी सायंकाळी ७ वा १५१५.४७  फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा  २१९६.२५९दलघमी( ७७.५५ टीएमसी)  झाला होता. यापैकी जीवंत जलसाठा १५४८.१५० दलघमी ( ५१.४८ टीएमसी) इतका झाला आहे.

चणकवाडी बंधाऱ्याचे दरवाजे काढण्यास प्रारंभ......जायकवाडी धरणाचा जलसाठा ७०% च्या आसपास आल्याने नजीकच्या काळात मोठा पाऊस झाला किंवा नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्यास धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. या दृष्टीने पैठण शहरालगत असलेल्या चनकवाडी बंधाऱ्याचे दरवाजे काढून घ्यावे लागतात.

आज कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे, आर ई चक्रे, अनिकेत हासबनीस, सुमित भताने आदीच्या पथकाने या बंधाऱ्याचे दरवाजे काढण्याची कार्यवाही सुरू केली. या बंधाऱ्यास एकूण ३८ दरवाजे असून एक दरवाजा काढण्यास साधारणपणे एक ते दीड तासाचा कालावधी लागतो. येत्या दोन दिवसात गेट काढण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असे कार्यकारी अभियंता काळे यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरण