शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

जैन तत्त्वज्ञान संशोधन केंद्र

By admin | Published: July 15, 2015 12:26 AM

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे कचनेर (ता. औरंगाबाद) जैन तत्त्वज्ञान संशोधन केंद्र सुरूकरण्यात येत असून,

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे कचनेर (ता. औरंगाबाद) जैन तत्त्वज्ञान संशोधन केंद्र सुरूकरण्यात येत असून, येत्या रविवारी (१९ जुलै) या केंद्राचे उद्घाटन होणार आहे. जैन तत्त्वज्ञानाचा संशोधनपर अभ्यास करण्यासाठी मराठवाड्यातील हे पहिलेच केंद्र असून, यासाठी श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेरच्या ट्रस्टची मोठी मदत झाली आहे. शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या प्रसिद्ध श्री अतिशय क्षेत्र कचनेर हे केवळ जैन धर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक स्थळ तर आहेच; परंतु या परिसरात विविध, सामाजिक उपक्रमही चालतात. त्यामुळे या ठिकाणाचे औरंगाबाद जिल्ह्यात मोठे महत्त्व आहे. नव्याने स्थापन होणाऱ्या या संशोधन केंद्रासाठी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील निवृत्त प्राध्यापक तसेच जैन तत्त्वज्ञानाचेही अभ्यासक असणारे डॉ. प्रकाश पापडीवाल यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाने नेमलेल्या समितीने या कचनेर येथे जाऊन या केंद्रासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची पडताळणी केली. विद्यापीठाच्या बृहत आराखड्याप्रमाणे कचनेर येथे जैन तत्त्वज्ञान केंद्र स्थापन करण्याबाबत विद्यापीठाच्या विद्या परिषदेने आधीच मान्यता दिलेली आहे. डॉ. पापडीवाल यांनी सांगितले की, या केंद्रासाठी आधीच्या एका इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले असून, तेथे विद्यार्थ्यांच्या संशोधन कार्यासाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.कचनेरच्या अतिशय क्षेत्रात जैन तत्त्वज्ञानासंबंधी मोठी ग्रंथसंपदा असून ती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. या परिसराच्या आसपास असणाऱ्या काही जैन क्षेत्रामध्ये दुर्मिळ हस्तलिखिते आहेत. ती संशोधन कार्यासाठी उपलब्ध करवून देण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न होतील. विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र विद्याशाखेच्या अंतर्गत हे केंद्र राहणार आहे. या केंद्रात संशोधनासाठी विद्यापीठच विद्यार्थी देणार आहे.केंद्रातर्फे आर्थिक भार आणि सुविधा पुरविण्याचे काम करण्यात आले आहे. या केंद्रामुळे जैन तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारे नवे दालन अभ्यासकांना उपलब्ध होणार आहे. या केंद्राचे १९ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते होणार आहे.४ यावेळी विक्रीकर सहआयुक्त सुमेरकुमार काळे आणि विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. व्ही. बी. खंदारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी डॉ. एम. एम. देसरडा, डॉ. एच. जे. नरके, डॉ. डी. आर. खैरनार यांचीही उपस्थिती राहणार आहे. सुरुवातीला आठ विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रवेश४ विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय कचनेरमध्येच केली जाणार४ एम. फिल आणि पीएच. डी. पदवीसाठी संशोधन४ पीएच. डी. साठी विद्यापीठाची ‘पेट’ उत्तीर्ण व्हावी लागणार४ आंतरराष्ट्रीय सेमिनार, परिषदा होणार