शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

‘त्या’ जवानावर बाभूळगावात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:38 AM

घातपाताची शक्यता : जबलपुरात बेपत्ता झालेल्या जवानाचा मृतदेह सापडल्याने खळबळ

वैजापूर : जबलपूर रेल्वेस्थानकातून १७ मे रोजी बेपत्ता झालेल्या तालुक्यातील बाभूळगाव बु. येथील जवानाचा मृतदेह जबलपूरपासून बारा कि.मी. अंतरावर रांझी येथे सापडल्याने खळबळ उडाली असून यात घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, रविवारी (दि.२७) या जवानावर त्यांच्या मूळगावी बाभुळगाव बु. येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नवनाथ गजानन चोपडे असे या मृत जवानाचे नाव आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांना जबर धक्का बसला असून आज गावात एकही चूल पेटली नाही.वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव बु. येथील नवनाथ गजानन चोपडे यांची पोस्टींग आसाम राज्यातील न्यू मिसामारी लांबा कॅम्प युनिट ६२६ येथे होती. पंधरा दिवसांची सुट्टी घेऊन ते पत्नी, एक मुलगा व एक मुलगी यांना घेऊन आसाम राज्यातील रंगिया रेल्वेस्थानकावरुन १५ मे रोजी गुवाहाटी -मुंबई एक्स्प्रेसने घरी येण्यासाठी निघाले होते. १७ मे रोजी मध्यप्रदेशातील जबलपूर स्थानकावर रेल्वे थांबल्यानंतर नवनाथ पाणी आणण्यासाठी खाली उतरले. पण परत आले नाही. त्यांच्या पत्नीने शोधाशोध केली. पण तोपर्यंत रेल्वेने स्थानक सोडले होते. पत्नी मंगल या दोन मुलांना घेऊन घरी आल्या व त्यांनी घडलेली आपबिती कुटुंबियांना सांगितली. दोन दिवस वाट बघितल्यानंतरही नवनाथ परत आले नाहीत म्हणून त्यांच्या सहकाºयांनी जबलपूर गाठले व तेथील रेल्वे पोलिसात नवनाथ हरविल्याची तक्रार दिली. पण नवनाथ यांचा तपास लागत नव्हता. पण या प्रकाराचा उलगडा जबलपूर येथील सैन्यदलाच्या कार्यालयात झाला. या कार्यालयात चोपडे यांचे कुटुंबिय चौकशीसाठी गेले असता त्यांनी नवनाथ यांच्या फोटोची मागणी केली. तेथील रेंजरने हा फोटो काही दिवसांपूर्वी व्हाट्स अ‍ॅप ग्रुपवरुन व्हायरल झाल्याची माहिती देत ताबडतोब पोलिसांशी संपर्क करण्यास सांगितले. जबलपूर पोलिस ठाण्याशी संपर्क केला असता त्यांनी रांझी पोलिसांना १८ मे रोजी अज्ञात इसमाचा मृतदेह मिळाल्याचे सांगितले. रांझी पोलिसांनी १९ मे रोजी शवविच्छेदन करुन २० मे रोजी दफनविधी केला होता. फोटोची ओळख पटल्यानंतर तेथील उपविभागीय अधिकाºयांच्या परवानगीने सहा दिवसांनंतर मृतदेह बहेर काढून पोलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. गणेश चोपडे, रवी चोपडे, माजी सरपंच अण्णा गायकवाड व बद्रीनाथ चोपडे यांनी रविवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास पार्थिव बाभुळगाव बु. येथे आणले. त्यावेळी आई, वडील, पत्नी, लहान भाऊ, नऊ वर्षांचा मुलगा अनिकेत व अकरा वर्षांची मुलगी प्रियंकासह ग्रामस्थांच्या भावना अनावर झाल्या. मृतदेह बघताच सर्वांनी हंबरडा फोडला. त्यांचा मुलगा अनिकेत याने पार्थिवाला अग्निडाग दिला. याप्रसंगी आ. भाऊसाहेब चिकटगावकर, रमेश पाटील बोरनारे, अभय पाटील चिकटगावकर आदींसह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.अश्रूंचा बांध फुटलाजवान नवनाथ चोपडे यांचे पार्थिव बघून बाभूळगावात अश्रूंचा बांध फुटला. दहा दिवसांपासून चिंताग्रस्त असलेल्या येथील ग्रामस्थांनी या जवानाला साश्रू नयनांनी शासकीय इतमामात अखेरचा निरोप दिला. लष्कराच्या सलामीबरोबर हजारोंच्या समुदायाने ‘नवनाथ भाऊ अमर रहे’ अशा घोषणा देताच बाभूळगाव गहिवरून गेले. सहा महिन्यानंतर नवनाथ चोपडे सैन्य दलातून सेवानिवृत होणार होते. पंधरा दिवसांपूर्वीच त्याने आपल्या आईला फोन करुन मी पंधरा दिवसांसाठी गावाकडे येत आहे, असे सांगितले होते, मात्र प्रवासा दरम्यान घडलेल्या घडामोडीनंतर नवनाथचा मृतदेहच गावात आला. आपल्या पोटच्या मुलाचा मृतदेह पाहताच त्याच्या आई-वडिलांनी हंबरडाच फोडला. सकाळपासून बाभूळगावकडे वाहनांची रिघ लागली होती. जो-तो मिळेल त्या वाहनाने बाभूळगावात येत होता. रस्त्यासह शेतातील पाऊलवाटाही गर्दीने ओसंडून गेल्या होत्या. 

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यू