लोकमत न्यूज नेटवर्कदैठणा : परभणी तालुक्यातील दैठणा परिसरात पाऊस पडावा, यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी गुरूवारी गोदावरी नदीपासून पायी दिंडी काढीत जल अभिषेक केला. यामध्ये २०० ते ३०० ग्रामस्थ सहभागी झाले होते. परभणी तालुक्यातील दैठणा परिसरात मृगनक्षत्राच्या सुुरुवातीला पाऊस झाला. या पावसावरच शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यानंतर मात्र पावसाने पाठ फिरविली. निघालेली पिकेही कोमेजून जात आहेत. यामुळे दुबार पेरणी करावी लागते की, काय? याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. पाऊस पडावा, यासाठी दैठणा, धोंडी, माळसोन्ना, साळापुरी, ब्रह्मपुरी, धारासूर, इंदेवाडी आदी गावातील शेतकऱ्यांनी पायी दिंडी काढून खळी, रुमणा, दैठणा येथे जलाभिषेक करण्यात आला. खळी गावाजवळील गोदावरी नदीपात्रातून या पायी दिंडीला सुरुवात करण्यात आली. यामध्ये २०० ते ३०० ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला. यशस्वीतेसाठी परिसरातील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
पावसासाठी जलाभिषेक
By admin | Published: July 14, 2017 12:15 AM