लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हाधिका-यांच्या गोपनीय अहवालाच्या आधारे जालना नगर परिषद बरखास्त करुन तेथे प्रशासक नेमण्याच्या हालचाली युद्धपातळीवर सुरु झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यानंतर निकषांची पूर्तता झाल्यास जालना नगर परिषद महापालिका होण्याची चिन्हे आहेत.जालना नगर परिषदेतील ढेपाळलेला कारभार, अस्वच्छता, बंद असलेले पथदिवे, विस्कळीत पाणीपुरवठा, लेखा परीक्षणातील त्रुटी, शहराची झालेली बकाल अवस्था या व अन्य कारणांमुळे शहराचा ‘लौकिक’ मंत्रालयापर्यंत पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी नगर विकास विभागाच्या सचिवांनी पालिकेचे लेखा परीक्षण करण्याचे आदेश दिले होते. प्रशासनाच्या वतीने लेखा परीक्षकांची नेमणूकही करण्यात आली. मात्र, त्यांच्याकडे कार्यभार सुपूर्द करण्यात आला नाही. वर्षभरापूर्वी नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली.
जालना न.प. बरखास्तीच्या हालचाली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:54 AM