शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

जालना रोड, बीड बायपासचे काम ५०० कोटींत बसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:51 PM

जालना रोड आणि बीड बायपास हे दोन्ही प्रकल्प आता ७८९ कोटी रुपयांवरून ५०० कोटींच्या आसपास अंदाजपत्रकात बसवून त्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दळणवळण मंत्रालयाकडून नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मराठवाडा विभागाला देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देडागडुजीसाठी १० कोटींची बोळवण : अनेक कामे वगळण्यासाठी केली सूचना; जयभवानीनगरातील रस्ता रुंदीकरणाचा प्रस्तावात समावेश

- विकास राऊत औरंगाबाद : जालना रोड आणि बीड बायपास हे दोन्ही प्रकल्प आता ७८९ कोटी रुपयांवरून ५०० कोटींच्या आसपास अंदाजपत्रकात बसवून त्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दळणवळण मंत्रालयाकडून नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मराठवाडा विभागाला देण्यात आल्या आहेत. या सूचनांमुळे ७८९ कोटी रुपयांचा हा प्रकल्प होण्याबाबत साशंकता असून, औरंगाबादकरांनी या प्रकल्पाची आशा सोडून दिलेलीच बरी, असे बोलण्याची वेळ आली आहे.

सप्टेंबर २०१६ मध्ये ७८९ कोटी रुपयांचा डीपीआर दळणवळण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. अजून त्या डीपीआरला मंजुरी देऊन निविदा काढल्या जात नाहीत. यासाठी स्थानिक पातळीवरील नेतेमंडळीदेखील केंद्रात पाठपुरावा करीत नाहीत, असा आरोप विरोधक करीत आहेत. नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) अंतर्गत केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केलेले हे दोन्ही प्रकल्प कागदावर येऊन अडीच वर्षे झाले आहेत. केम्ब्रिज शाळेजवळील उड्डाणपूल तसेच नगरनाका येथील उड्डाणपूल या प्रकल्पातून कमी करण्यात यावा. ड्रायपोर्टच्या प्रकल्पात या दोन्ही कामांचा समावेश केला तर १०० कोटी रुपये वाचतील. जयभवानीनगरच्या रुंदीकरणाचा प्रस्तावदेखील याच कामात समाविष्ट करण्यात आलेला आहे. तीन वर्षांपासून ते काम रखडले आहे. जालना रोडच्या कामाला जोपर्यंत मुहूर्त लागत नाही, तोपर्यंत त्या रस्त्याचे कामदेखील होणे आता शक्य नाही. बीड बायपासची ओळख अपघात रस्ता म्हणून होत आहे. गेल्या वर्षी त्या रस्त्याच्या कामासाठी आंदोलने झाली, पण त्याचा काहीही फरक पडला नाही.

डागडुजीच्या निधीतही मारली दांडीडागडुजीच्या निधीतही एनएचएआयने दांडी मारली आहे. ७६ कोटी रुपयांची घोषणा बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्रालयाच्या सूचनेवरून केली; परंतु आता ३५ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामध्ये १३ कोटी रुपये जालना रोडच्या सरफे सिंगसाठी ठेवण्यात आले होते. त्यातही एनएचएआयने दांडी मारून १० कोटींच्या निविदा काढण्याचा विचार सुरू केला आहे.

पाच वर्षे जालना रोडवर खड्डा पडणार नाही, असा दावा करण्यात येत आहे. या सगळ्या कामांत बीड बायपासवर एक छदामही खर्च करण्यात येणार नाही. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन ते वसंतराव नाईक चौक, सिडको या रस्त्याचा समावेश नाही. त्यामुळे ७८९ कोटींचा प्रकल्प ५०० कोटींवर आणला तरी त्याला गती मिळण्याबाबत साशंकता आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाhighwayमहामार्ग