शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

जालना रोडचे रूपडे बदलणारे डिझाईन तयार

By admin | Published: June 20, 2017 12:06 AM

औरंगाबाद : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) ४०० कोटी रुपयांतून होणाऱ्या जालना रोड रुंदीकरणाचे रूपडे बदलणारे ‘थ्रीडी’ डिझाईन तयार केले

विकास राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) ४०० कोटी रुपयांतून होणाऱ्या जालना रोड रुंदीकरणाचे रूपडे बदलणारे ‘थ्रीडी’ डिझाईन तयार केले असून, त्याचे वरिष्ठ पातळीवर सादरीकरण करण्यात येणार आहे. डीपीआरच्या मंजुरीनंतर तयार करण्यात आलेल्या डिझाईनचा बेस हा विदेशी रस्त्यांवर आधारित असून, वाहतूक नियंत्रणाची रचना असलेले उड्डाणपूल, भुयारी मार्ग, फुटपाथ, सायकलमार्ग, बसमार्ग, सरकते जिने आणि टॉयलेटस्च्या सुविधांसह वाहतूक पोलिसांसाठी विशेष कक्ष असलेला हा आराखडा आहे. एनएचएआयचे डिझायनर धीरज देशमुख यांनी सांगितले की, जालना रोडचे डिझाईन सुरक्षित ड्रायव्हिंगच्या अनुषंगाने तयार केलेले आहे. वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, अशा दिशेने रोडवरील सर्व मुख्य चौक जोडण्यात आले आहेत. त्यामुळे शून्य अपघाताचा हा रोड असेल. प्रत्येक २५० मीटरवर फुटपाथ आणि ओव्हरब्रिजची तरतूद करण्यात आली आहे. सिटीबससाठी वेगळा ट्रॅक असणार आहे. स्मार्टसिटीसाठी त्याचा फायदा होईल. प्रत्येक फुटब्रिजला लिफ्टची व्यवस्था असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर ठरू शकेल. प्रत्येक फुटब्रिजलगत प्रसाधनगृहाची व्यवस्था असेल. फुटब्रिजच्या लिफ्ट सौरऊर्जेवर चालणाऱ्या असतील. उड्डाणपुलाखाली जागा रस्ता संचलन कार्यालय, लहान पार्किंग, पोलीस चौकी व इतर कार्यालयांसाठी असेल. यातून पालिकेला उत्पन्न मिळू शकेल. तसेच जाहिरात फलकांसाठी वेगळी जागा विकसित केली जाईल. यातून मिळणारे उत्पन्न रस्त्याच्या देखभालीसाठी वापरले जाईल. संकल्पित डिझाईननुसार जालना रोड आणि बीड बायपासचे काम झाले तर या शहरातील वाहतूक नियंत्रण करणारे रस्ते म्हणून या दोन्ही रस्त्यांची ओळख निर्माण होईल. त्यासाठी निविदा निघण्याची गरज आहे.