- विकास राऊत
औरंगाबाद : जालना रोडचे काम ४०० कोटींहून २४५ कोटींत करा, नंतर ते १०४ कोटींमध्येच करण्याचे आदेश देण्यात आले आणि आता ६६ कोटींतच ते काम गुंडाळा असा निर्णय केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने घेतल्यामुळे त्या प्रकल्पात तिसऱ्यांदा सुधारणा करीत ४० कोटींची कपात केल्याची माहिती पुढे आली आहे. बीड बायपासचे काम एनएचएआयच्या अंतर्गत येण्यात शासकीय अडथळा निर्माण झाल्याचे सांगून ते काम आता रद्द केले आहे, तर जालना रोडच्या कामात जून ते जानेवारी या सहा महिन्यांत तीन वेळेस निधीची तरतूद बदलली आहे. त्याुमळे जालना रोडचे काम ६६ कोटींतून कसे करणार, हा प्रश्न आहे. मूळ प्रकल्पातील सर्व उड्डाणपुले व इतर सुविधा रद्दच झाल्या आहेत.
डिसेंबर २०१५ मध्ये जालना रोड आणि बीड बायपाससाठी ७८९ कोटी रुपयांची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्यानंतर जून २०१८ मध्ये गडकरी यांनी दोन्ही प्रकल्पांसाठी २४५ कोटींची घोषणा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या पत्रपरिषदेत केली. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात १०४ कोटींतून जालना रोडचे काम करण्याचा अंतिम निर्णय झाल्यानंतर आता जानेवारीत ६६ कोटींतूनच काम करण्याच्या सूचना आहेत.सप्टेंबर २०१६ मध्ये तत्कालीन प्रकल्प अधिकारी यू. जे. चामरगोरे यांनी जालना रोड आणि बीड बायपासचा एनएचएआयच्या मुख्यालयास सादर केलेला डीपीआर गुंडाळून ठेवण्यात आला आहे.
औरंगाबादकरांच्या तोंडाला पुसली पाने जालना रोड आणि बीड बायपासच्या कामाप्रकरणी एनएचएआयने औरंगाबादकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. जालना रोडची एकूण लांबी १४ कि़मी. आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ७८९ कोटी इतकी होती. सहा पदरांमध्ये सर्व्हिस रोड, सायकल ट्रॅक, फुटपाथसह ४५ ते ६० मीटर डीपी रोडचा समावेश होता.२ तीन उड्डाणपुले, ६ भुयारी मार्ग, दोन रेल्वे उड्डाणपुलांचा मूळ डीपीआर होता. २०१७ मध्ये जालना रोडवरील उड्डाणपुलांची संख्या ५ वरून ३ केली. मुकुंदवाडी आणि चिकलठाणा येथील उड्डाणपुले रद्द करण्यात आली, तर बीड बायपासचा ३८९ कोटींचा प्रकल्पच रद्द करण्यात आला आहे.
जालना रोडसाठी घोषणाडिसेंबर २०१५ ४०० कोटीजून २०१८ २४५ कोटीडिसेंबर २०१८ १०४ कोटीजानेवारी २०१९ ६६ कोटी