शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जालना रोड सहा पदरी करणार; ७५ कोटींची निविदा निघाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 10:54 PM

जालना रोडचे काम ४०० कोटींहून २४५ कोटींत करा, नंतर ते १०४ कोटींमध्येच करण्याचे आदेश देण्यात आले आणि आता ७५ कोटीतच ते काम करण्यात येणार आहे. या कामाची निविदा नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने काढली आहे. कंत्राटदार अंतिम होताच जालना रोड सहा पदरी करण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. रोड सहा पदरी करणे आणि पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम यातून करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबीड बायपासचे रुंदीकरण होणे अशक्य: कंत्राटदार अंतिम होताच काम सुरू होणे शक्य

औरंगाबाद : जालना रोडचे काम ४०० कोटींहून २४५ कोटींत करा, नंतर ते १०४ कोटींमध्येच करण्याचे आदेश देण्यात आले आणि आता ७५ कोटीतच ते काम करण्यात येणार आहे. या कामाची निविदा नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने काढली आहे. कंत्राटदार अंतिम होताच जालना रोड सहा पदरी करण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. रोड सहा पदरी करणे आणि पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम यातून करण्यात येणार आहे.बीड बायपासचे काम एनएचएआयच्या अखत्यारीत येत नाही. त्यात शासकीय अडथळा निर्माण झाल्याचे सांगून बीड बायपासचा ३८९ कोटींचा प्रकल्पच रद्द करण्यात आला आहे. जालना रोडचे काम ७५ कोटीदरम्यान होणार आहे. जालना रोडचे रुंदीकरण होणार नाही. तसेच त्यावर बीटी सरफेसचे काम एनएचएआय करणार नाही. पेव्हर ब्लॉकसह एकेक पदर दोन्ही बाजूंनी वाढविण्यात येईल. रोडची लेव्हल एकच असेल, सहा पदरी रोड होईल. नगरनाका ते चिकलठाणापर्यंत रोडचे काम करण्यात येईल. दोन्ही बाजूंनी साडेतीन मीटरचा एक पदर वाढविण्यात येईल, असा अंदाज सूत्रांनी वर्तविला.जालना रोडच्या कामाचा प्रवास असाडिसेंबर २०१५ मध्ये जालना रोड आणि बीड बायपाससाठी ७८९ कोटी रुपयांची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्यानंतर जून २०१८ मध्ये गडकरी यांनी दोन्ही प्रकल्पांसाठी २४५ कोटींची घोषणा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या पत्रपरिषदेत केली. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात १०४ कोटींतून जालना रोडचे काम करण्याचा अंतिम निर्णय झाल्यानंतर आता जानेवारीत ७५ कोटीतूनच काम करण्याच्या सूचना केल्या गेल्या. फेबु्रवारी-मार्च महिन्यांत या कामासाठी निविदा काढण्यात आल्या.जालना रोडसाठी आजवरच्या घोषणाडिसेंबर २०१५ ४०० कोटीजून २०१८ २४५ कोटीडिसेंबर २०१८ १०४ कोटीजानेवारी २०१९ ७५ कोटीरोडवर करण्यात आले मार्किंगजालना रोडच्या दोन्ही बाजूला पिवळ्या रंगाने मार्किंग करण्यात आले आहे. सदरील मार्किंग सार्वजनिक बांधकाम विभाग, एनएचएआय केंद्र व राज्य शासनाच्या विभागाने केलेले नाही. तिन्ही विभागांनी या मार्किंगशी संबंध नसल्याचे सांगितले. एनएचएआय सूत्रांनी सांगितले, जालना रोडच्या कामासाठी निविदा काढल्या आहेत; परंतु त्या अनुषंगाने कोणतेही मार्किंग रोडवर एनएचएआयने केलेले नाही.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षा