औरंगाबाद : विजय झोल आणि ऋषिकेश काळे यांच्या शानदार कामगिरीनंतर व्यंकटेश काणेची जादुई फिरकी गोलंदाजी आणि रामेश्वर दौड व शोएब सय्यद यांची भेदक गोलंदाजी या बळावर जालना संघाने शिरपूर येथे झालेल्या एमसीएच्या सीनिअर क्रिकेट स्पर्धेत पुण्याच्या सीएनए संघाचा १0८ धावांनी धुव्वा उडवला.विजय झोल (१३४), ऋषिकेश काळे (५९), ऋषिकेश पांगारकर (४0) व रामेश्वर इंगळे (३९) यांच्या बळावर जालना संघाने पहिल्या डावात ३४५ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात सीएनएचा संघ २५३ धावा फटकावू शकला. त्यांच्याकडून अविनाश शिंदेने १४३ व रोहित जे. याने ५0 धावा केल्या. जालना संघाकडून व्यंकटेश काणे याने ३६ धावांत ४ गडी बाद केले. त्याला वेगवान गोलंदाज शोएब सय्यदने ५६ धावांत ३ व रामेश्वर दौड आणि आशिष देशमुख यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. पहिल्या डावात ९२ धावांची आघाडी घेणाऱ्या जालना संघाने विजय झोल आणि ऋषिकेश काळे यांनी केलेल्या ९0 धावांच्या भागीदारीच्या बळावर दुसºया डावात १५४ धावा फटकावल्या. कर्णधार ऋषिकेश काळेने ५८ व विजय झोलने ४४ धावांची स्फोटक खेळी केली. रामेश्वर दौडने २७ धावांचे योगदान दिले. सीएनएकडून सागर होगडे व प्रतीक सारगदे यांनी प्रत्येकी ४ गडी बाद केले.विजयासाठी २४७ धावांचा पाठलाग करणारा सीएनएचा संघ २९ षटकांत १३८ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून अविनाश शिंदेने ५३ धावा केल्या. जालना संघाकडून व्यंकटेश काणे, शोएब सय्यद आणि रामेश्वर दौड यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. जालना संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान देणाºया व्यंकटेश काणे याने या लढतीत एकूण ७९ धावांत ७ बळी घेतले.संक्षिप्त धावफलकजालना (पहिला डाव) : ३४५. (विजय झोल १३४, ऋषिकेश काळे ५९.). दुसरा डाव : २९ षटकांत १५४. (ऋषिकेश काळे ५८, विजय झोल ४४, रामेश्वर दौड २७. सागर होगडे ४/३४).सीएनए : पहिला डाव : २५३. (अविनाश शिंदे १४३, रोहित जे. ५0. व्यंकटेश काणे ४/३६, शोएब सय्यद ३/५६, रामेश्वर दौड १/३५, आशिष देशमुख १/२३). दुसरा डाव : २९ षटकांत सर्वबाद १३८. (अविनाश शिंदे ५३, रोहित जे. २३, देवदत्त नातू २१. शोएब सय्यद ३/१३, व्यंकटेश काणे ३/४३, रामेश्वर दौड ३/७४).
जालना संघाने उडवला सीएनएचा १0८ धावांनी धुव्वा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 12:33 AM
विजय झोल आणि ऋषिकेश काळे यांच्या शानदार कामगिरीनंतर व्यंकटेश काणेची जादुई फिरकी गोलंदाजी आणि रामेश्वर दौड व शोएब सय्यद यांची भेदक गोलंदाजी या बळावर जालना संघाने शिरपूर येथे झालेल्या एमसीएच्या सीनिअर क्रिकेट स्पर्धेत पुण्याच्या सीएनए संघाचा १0८ धावांनी धुव्वा उडवला. विजय झोल (१३४), ऋषिकेश काळे (५९), ऋषिकेश पांगारकर (४0) व रामेश्वर इंगळे (३९) यांच्या बळावर जालना संघाने पहिल्या डावात ३४५ धावा ठोकल्या.
ठळक मुद्देएमसीए : व्यंकटेश काणेचे एकूण ७ बळी, शोएब, रामेश्वर चमकले